कोल्हार(जनता आवाज वृत्तसेवा):-आज शनिवार विद्यालयात ग्रामपंचायत भगवतीपुर यांच्यातर्फे ओपन जिमचे साहित्य मिळाले त्याचे उद्घाटन .डॉ भास्करराव खर्डे संचालक प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था यांच्याहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष संभाजी देवकर,भगवतीपुर ग्रामपंचायतचे सरपंच दत्तात्रय राजभोज,उपसरपंच प्रकाश खर्डे,भगवतीमाता देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष साहेबराव दळे, श्रीकांत खर्डे ,गोरक्ष खर्डे , सर्जाराव खर्डे, सुनील शिंदे, कोल्हार वरिष्ठ महाविद्यालयाचे हरिभाऊ आहेर सर व प्राचार्य अडेप मॅडम, सर्व सेवक इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.