गुहा(जनता आवाज वृत्तसेवा):-गुहा गावातील सामाजिक, शैक्षणिक धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आदेश प्रतिष्ठान गणेश उत्सव निमित्त अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब तसेच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याहस्ते गणेश मूर्तीची पूजा करून आरती करण्यात आली. त्यानंतर आदेश प्रतिष्ठांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा कानिफनाथ देवस्थानचा फोटो ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
दरम्यान याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना वाकचौरे साहेब यांनी सांगितले कि तरुण मुलांनी समाजात सामाजिक ,उपक्रम डोळ्यासमोर ठेवून गणेश उत्सव साजरा करावा. सर्वांनी कायदा, सुव्यवस्था अबाधित राहिल याची काळजी घ्यावी असे आवाहन करून यावेळी आदेश प्रतिष्ठान राबवत असलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सचिन खपके हर्षद कोळसे दर्शन खपके , रवींद्र डौले ,आयुष कोळसे सुरेश खपके, स्वप्नील कोळसे ,ओम मुसमाडे , लखन कोळसे ,अमोल कोळसे ,किरण डौले शुभम खपके ,अभिषेक कोळसे, कार्तिक डौले अशोक कोळसे ,रुपेश सौदागर सागर खपके ,अक्षय कोळसे, डॉ वाबळे ,रोहित डौले, श्री हरी आंबेकर , ऋत्विक डौले , शामभाऊ कोळसे , चैतन्य डौले , संकेत कोळसे, सार्थक डौले , राहुल सौदागर ,किरण डौले अमुल कोळसे ,अनिल सौदागर, बाळासाहेब डौले ,अनिल कोळसे, नवनाथ कोळसे , गौरव डौले , साई कोळसे , अमोल जगताप , राजेंद्र कोळसे , धनंजय कुचेकर ,अनिकेत कोळसे , मुकेश खपके ग्रामस्थ आदी उपस्थित होते.