16.1 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

spot_img
spot_img

गावठी पिस्तुलाच्या थरारानंतर श्रीरामपूर पोलिसांची २४ तासांत धडाकेबाज कारवाई, मुख्य आरोपी शेखसह दोन आरोपी जेरबंद

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा) :- श्रीरामपूर शहराच्या मध्यवर्ती छत्रपती शिवाजी रोडवर झालेल्या गावठी पिस्तुलाच्या थरारानंतर श्रीरामपूर पोलीस दलाने अवघ्या २४ तासांत कारवाईचा धडाका दाखवत मुख्य आरोपी हुजेफा शेखसह इतर दोन फरार आरोपींना जेरबंद केले आहे. या जलद कारवाईमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला मोठा दिलासा मिळाला असून गुन्हेगारी जगतात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस प्रमुख सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या सूचनांनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदेव भंवर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत अवघ्या एका दिवसात सापळा रचून हुजेफा शेखला बेड्या ठोकल्या. त्याचबरोबर विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या इतर दोन आरोपींनाही ताब्यात घेतले.

या कारवाईनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी भंवर यांनी स्पष्ट केले की, “शहरात गुन्हेगारीला थारा दिला जाणार नाही. रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची कसून चौकशी केली जाईल. नियमित कॉम्बिंग ऑपरेशन व अवैध धंद्यांवर कठोर कारवाई केली जाईल.” त्यांनी पुढे सांगितले की, गुन्हेगारीबाबत नागरिकांना जर कोणतीही माहिती मिळाली तर ती त्वरित पोलिसांना कळवावी. माहिती देणाऱ्यांची ओळख संपूर्णपणे गुप्त ठेवली जाईल व तत्काळ कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!