बेलापूर (जनता आवाज वृत्तसेवा):- कमी पडणारा पाऊस लक्षात घेवुन शेती सुजलाम सुफलाम करावयची असेल तर भविष्यात ठिबक सिंचनाचाच वापर करावा लागणार असल्याचे मत अशोक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा भानुदास मुरकुटे यांनी व्यक्त केले प्रवरा माईच्या जल पूजनाचा कार्यक्रम नुकताच मुरकुटे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास माजी आमदार भाऊसाहेब कांबळे संजय छल्लारे ,भरत साळुंके, रवींद्र खटोड, भास्कर बंगाळ ,बेलापूर खुर्द च्या सरपंच सविता राजुळे, भगवान सोनवणे आदि ग्रामस्थ उपस्थित होते भंडारदरा धरणाचे आपल्या हक्काचे पाणी गेले त्यामुळे आहे त्या पाण्यातही शेती करावयाची असेल तर भंडारदरा धरणातून बंद पाईप द्वारे पाणी आणून ड्रीप द्वारे शेतीला द्यावे लागणार आहे जल है तो कल है भविष्यात पावसाचे प्रमाण कमी होणार आहे हे ओळखून आपल्याला कमी पाण्यात शेती कशी करता येईल इजराइलच्या धरतीवर आपण ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा पद्धतीचा वापर करून शेती केली पाहीजे.
अशोक सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आपण शासनाच्या वतीने प्रवरा व गोदावरी नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधले असेही मुरकुटे म्हणाले. यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, विक्रम नाईक आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी भगवान सोनवणे, हिंमतराव धुमाळ, निरज मुरकुटे, प्रसाद खरात, प्रकाश नवले बेलापूर सोसायटीचे या चेअरमन राजेंद्र सातभाई ,शांतीलाल हिरण, प्रशांत लड्डा, लहानु नागले, यादव काळे ,चंद्रकांत नाईक, सुनिल नवले ,अन्तोन अमोलीक, शिवाजी वाबळे ,अशोक वहाडणे, किशोर कांबळे, पत्रकार अशोक गाडेकर, ज्ञानेश गवले, देविदास देसाई, दिलीप दायमा,सुहास शेलार आदि उपस्थित होते.