श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील एका महिलेचा रेल्वे खाली सापडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली .
बेलापूर येथील तीन महिला आपल्या खाजगी कामासाठी श्रीरामपूर येथे आल्या होत्या . श्रीरामपूर बस स्थानकापासून माल धक्क्याच्या रस्त्याने त्या रेल्वे रूळ क्रॉसिंग करत होत्या. याच वेळी पुणे येथून जलद गतीने रेल्वे येत होती. यातील दोन महिलांनी रेल्वे रूळ ओलांडला . परंतु एक महिलेचा पाय रुळामध्ये अडकळ्याने ती खाली पडली . सदर दोन महिलांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला.
परंतु रेल्वेला गती असल्यामुळे सदर महिला रेल्वेखाली सापडून तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.