लोणी (जनताआवाज वृत्तसेवा):- प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलचे ज्येष्ठ विज्ञान शिक्षक ज्ञानेश्वर आरंगळे यांना दि 31 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा विज्ञान अध्यापक संघ अहिल्यानगर तर्फे कृतिशील व उपक्रमशील विज्ञान अध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अशी माहिती शाळेचे प्राचार्य डॉ बी बी अंबाडे यांनी दिली.
हा पुरस्कार विज्ञान विषयात केलेल्या भरीव योगदानाबद्दल तसेच विज्ञान विषयाच्या अध्यापनाबरोबरच विविध वैज्ञानिक व शैक्षणिक उपक्रमातील सक्रिय सहभागाबद्दल प्रदान केला जातो. शैक्षणिक वर्ष सन 2024 – 25 मधील राहाता तालुक्यातून त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली. अहिल्यानगर येथे रविवार दि 31 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध शास्त्रज्ञ रोहित मोरे (व्ही आर डी ई व डी आर डी ओ) यांच्या शुभहस्ते त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रवरा पब्लिक स्कूलचे ज्ञानेश्वर आरंगळे यांनी मिळवलेल्या या सन्मानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष अभिनंदन केले.
तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या सीईओ डॉ. सुष्मिता विखे पाटील, अतिरिक्त सीईओ डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे यांनीही अभिनंदन केले. शाळेचे प्राचार्य डॉ बी बी अंबाडे, उपप्राचार्य श्री के टी अडसूळ, पर्यवेक्षिका सौ एम एस जगधने, सौ शुभांगी रत्नपारखी यांनीही त्यांचे कौतुक केले.