मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):-मुंबईत मराठा आंदोलकांच्या हुल्लडबाजीवर हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसंच सकारला नियमांनुसार कारवाईचे आदेशही दिले आहेत. यापार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे यांनी आपल्या समर्थकांना महत्वाचं आवाहन केलं आहे.ज्यांना ऐकायचं नाही त्यांना थेट आदेशच त्यांनी दिला आहे.
जरांगे म्हणाले, “आम्हाला कोर्टाच्या निर्णयाचं आपल्याला पालन करायचं आहे. सर्व आंदोलकांनी शांत राहावं. सगळ्यांनी कॉर्नर मैदानात या, रोडवर फिरु नका. तसंच ज्यांना ऐकायचं नाही त्यांनी सरळ गावाकडं निघून जावं. तुमच्या लेकरांसाठी मी लढतोय. मुंबईकरांना त्रास होईल असं कुणी वागू नका. मुंबईतील सर्व वाहनं पार्किंगमध्ये लावा. सगळ्यांनी गाड्या मैदानात लावायच्या आहेत आपल्याला जातीला जिंकवयाच आहे” पण काहीही झालं तरी आपण आरक्षण घेऊनच थांबणार आहोत, त्याशिवाय आपण उठणार नाही. आरक्षण मिळाल्याशिवाय मी मैदान सोडणार नाही, अशी ठाम भूमिका यावेळी जरांगेंनी मांडली.
सध्या जे आंदोलक आहेत तेच आंतरवलीत देखील होते, पण इथं (मुंबईत) मात्र काहीतरी षडयंत्र होतंय, अशा शब्दांत जरांगेंनी मीडियावरही टीका केली. जरांगे म्हणाले, “आंतरवाली सराटीमध्ये हाच मीडिया हेच पत्रकार आणि आमचे हेच आंदोलनकर्ते होते. पण पत्रकारांना त्रास झाला हे इथंच ऐकायला मिळालं, हे सगळं षडयंत्र आहे. कोणाच्या तरी नादी लागून कोणीतरी फुगवून दिलं आहे, सगळं कळतं आम्हाला” तेव्हा मीडियाने पण कोणाच्या ऐकू नाही. आत्ताची सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडवावी.
जरांगे म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण जे आंदोलन उभे केले आहे. ते आपल्या कोणत्याही चुकीच्या वागण्यामुळे याला गालबोट लागू नये याची सर्व मराठा बांधवांनी दखल घ्यावी. अशी भावनिक साद घातली आहे.