17.5 C
New York
Wednesday, September 3, 2025

Buy now

spot_img
spot_img

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी सांस्कृतिक व्यासपीठ – डॉ. सुष्मिता विखे पाटील

सात्रळ (जनता आवाज वृत्तसेवा):-राज्याचे जलसंपदा मंत्री  ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व मा. श्री डॉ.सुजय विखे पाटील चेअरमन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने) सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक गाव एक गणपती उपक्रमांतर्गत प्रवरा सांस्कृतिक महोत्सव 2025 अंतर्गत प्रवरा सिद्धिविनायक क्लस्टर सात्रळ ता. राहुरी सांस्कृतिक कार्यक्रम मंगळवार दि. 2 रोजी सायंकाळी ५:३० वा श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पाथरे बुद्रुक तालुका राहाता जिल्हा अहिल्यानगर येथे संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या उद्घाटन बोलताना डॉ सुष्मिता विखे पाटील म्हणाल्या की प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने नेहमी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून वाडी- वस्तीवरील सर्व विद्यार्थ्यांच्या कला,नाट्य, अभिनय गुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून दिले असून यातून नवोदित कलाकार उदयाला येत आहेत मुलांमधील सुप्त कलागुण या कार्यक्रमामुळे विकसित होतात त्याचा जास्त ग्रामीण भागातील विद्यार्थी करून घेत आहेत असेही त्या म्हणाल्या

या कार्यक्रमात सात्रळ पंचक्रोशीतील 15 शाळांनी 18 कार्यक्रम सादर केले त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघे वस्ती धानोरे यांनी प्रथम क्रमांक माध्यमिक गटात श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पाथरे बु. यांनी प्रथम क्रमांक तर वरिष्ठ गटात कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सात्रळ तालुका राहुरी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला विजेत्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या सांस्कृतिक कार्यक्रमात एकापेक्षा एक वरचढ असे कार्यक्रम सादर करण्यात आले या सर्व कार्यक्रमांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली त्याचबरोबर रोख स्वरूपात बक्षीसही देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण भव्य लकी ड्रॉ सोडत काढण्यात आली. त्यामध्ये मुख्य आकर्षण असलेल्या भव्य लकी ड्रॉ सोडत काढण्यात आली त्यामध्ये टिफिन बॉक्स पासून ते फ्रिज अशी बक्षिसे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भाग्यवंतांना बक्षिसे वितरित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोऱ्हाळे सर व प्रा.डॉ  शिंदे सर यांनी केले तर आभार डॉ प्रा. संदीप म्हस्के यांनी मानले.

यावेळी संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे , डायरेक्टर महेश खर्डे सर, बाळकृष्ण चोरमुंगे, आप्पासाहेब दिघे , रमेश पन्हाळे , आबासाहेब घोलप , उमेश घोलप,आरिफभाई शेख,सुभाष अत्रे .पोपटराव वाणी, . जयवंत जोर्वेकर .अण्णासाहेब कडू,. शिवाजी नरहरी घोलप, .अशोक भागवत घोलप,प्राचार्य डॉ. प्रा. शिंगोटे, मुख्याध्यापक  सांगळे, .कुटे,  तुपे यांच्यासह विविध जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक, ग्रामस्थ,पालक,नागरिक व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते

या कार्यक्रमासाठी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पाथरे बु. प्राचार्य श्री बारगुजे सर,सर्व शिक्षक – शिक्षिका, शिक्षकेतर सेवक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!