संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- आ. सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतभर ढोल ताशा पथकांच्या माध्यमातून नावलौकिक मिळविणाऱ्या 400 वादकांना एकत्र करून संगमनेरचा एकरूपतेची संस्कृती दाखवणाऱ्या महावादन महामेळा हा आय लव संगमनेर चळवळीचा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे.
गणेश उत्सवानिमित्त संगमनेर शहरात संगमनेर मधील नामांकित ढोल ताशा पथकाने श्री गणेशाला वादनाच्या माध्यमातून अभिवादन केले. यामध्ये 400 युवक व युवतींनी सहभाग नोंदवला.
इलेक्ट्रॉनिक वाद्य आणि डीजेच्या जमाने मध्ये पारंपारिक वाद्यांचे महत्त्व वाढले आहे. भारताची वाद्य संस्कृती जिवंत राहावी याकरता संगमनेर मधील विविध कलाकारांनी एकत्र येऊन ढोल ताशा पथक निर्माण केले. परंतु पुढे जसजशी मागणी वाढत गेली तसतसे काही स्वतंत्र ढोल ताशा पथक निर्माण झाले. या सर्व ढोल ताशा पथकांमध्ये तरुणांबरोबर तरुणींचाही सहभाग वाढू लागला. मुंबई पुणे सारख्या शहरांमधून निर्माण झालेले ढोल ताशा पथक आणि अजय अतुल च्या संगीतामुळे ढोल ताशा पथकांची संपूर्ण राज्यभर आणि देशभर क्रेज निर्माण झाली.
यामध्ये संगमनेरच्या ढोल ताशा पथकांचाही मोठा सहभाग राहिला. संगमनेरमधील तांडव, हिंदूराजा, रुद्र, एकलव्य, छावा या ढोल ताशा पथकांचा देशभर लौकिक निर्माण झाला.अगदी काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते पश्चिम बंगाल इथपर्यंत संगमनेर मधील विविध ढोल ताशा पथकांनी आपले कार्यक्रम सादर केले.
कवी अनंत फंदी, शाहीर विठ्ठल उमप, पवळा हिवरगावकर यांच्यापासून सुरू झालेली सांस्कृतिक क्षेत्राची परंपरा पुढे अनेक कलावंतांनी जपली. राज्याचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर हे खऱ्या अर्थाने जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी ठरली. नाट्य कलावंत सिने कलावंत विविध मालिकांमधून अनेक गुणवंत कलाकारांनी आपला राज्यभर लवकिक निर्माण केला. याचबरोबर हिंदी मराठी चित्रपट सृष्टीसह शास्त्रीय वादन गायन अशा विविध कला क्षेत्रातील नामवंत मान्यवरांना संगमनेर मध्ये आणून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे कार्यक्रम संगमनेरवासियांसाठी आयोजित केले.
ही मोठी सांस्कृतिक परंपरा असताना तरुणाई मध्ये क्रेझ निर्माण झालेल्या ढोल ताशा पथकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून आय लव संगमनेर या चळवळीच्या माध्यमातून तांडव, हिंदूराजा, रुद्र ,एकलव्य व छावा 400 कलाकारांच्या उपस्थितीत महावादन सोहळा झाला.
संगमनेर बसस्थानक परिसरामध्ये, आकर्षक विद्युत रोषणाई, भव्य स्टेज, एलईडी, प्रेक्षक गॅलरी, आणि वादकांच्या महामेळासाठी लाभलेली हजारोंची उपस्थिती. सुमारे तीन तास चाललेला पारंपारिक वाद्यांचा गजर. श्री गणरायाच्या वंदने पासून मराठी व हिंदी गीतांवर झालेला सांस्कृतिक जागर हे या महामेळाव्याचे वैशिष्ट्य ठरले. आकर्षक ढोल पथके, झांजरी, पाच पथकातील तरुण व तरुणींनी घातलेल्या पारंपारिक सफेद कोणता कमरेला लाल ओढणी आणि डोक्याला मराठमोळा लाल फेटा यामुळे केलेली वेशभूषा यामुळे हा सोहळा अद्वितीय ठरला.
तरुणांमधील मनभेद कमी करून एकरूप होण्याची ही संस्कृती या महावादन मेळाव्याने वाढविली. सौ शहरी एक संगमनेरी ही म्हण असून संगमनेर जेव्हा जेव्हा एकत्र आले त्यावेळेस राज्याला दिशादर्शक काम झाले की परंपरा या युवकांनी आ. सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात जपली. या सोहळ्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात, मा आमदार डॉ सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे ,डॉ जयश्रीताई थोरात, गिरीश मालपाणी यांच्यासह संगमनेरमधील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.
या भव्य दिव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सौ.मैथिलीताई तांबे, निखिल पापडेजा, शैलेश कलंत्री, नितीन अभंग, एकनाथ श्रीपत ,सौरभ उमर्जी, कमलेश उनवणे, अंबादास आडेप, गोपी शिंदे, शेखर सोसे, हर्षल राहणे ,शुभम परमेशी, आदित्य बर्गे ,गौरव डोंगरे, सुमित पानसरे ,विजय उदावंत, हैदर आली, ओम भडांगे ,रवी जाधव, सागर कानकाटे, सुमित पवार ,विशाल वैराळ यांच्यासह आय लव संगमनेरच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व युवकांचे आमदार सत्यजित तांबे व डॉ.सौ. मैथिलीताई तांबे यांनी अभिनंदन केले आहे.
महावादन सोहळा संगमनेरची एकरूपता दाखवणारा – बाळासाहेब थोरात
देशभर लौकिक असलेल्या विविध ढोल ताशा पथकातील सर्व तरुण व तरुणी एकत्र येऊन आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून झालेला महावादन सोहळा शहरवासीयांसाठी मोठी आनंदाची पर्वनी ठरला आहे .संगमनेर मध्ये सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन आनंदाने राहतात आणि ही संगमनेरची एकतेची परंपरा सर्व युवकांनी पुढे न्यावी असे आवाहन त्यांनी केले.
महावादन सोहळा एकतेचे प्रतीक – आमदार सत्यजीत तांबे
400 युवक व युवतींच्या सहभागातून झालेल्या या महावादन सोहळ्यातून संगमनेरची वैभवशाली परंपरा असलेल्या एकात्मतेचा व एकजुटीचा संदेश तरुणांनी दिला आहे. संगमनेर हे मोठी सांस्कृतिक परंपरा लाभलेले शहर असून या पुढील काळातही आय लव संगमनेर चळवळीच्या वतीने सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करून तालुका व शहरातील कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून दिले जाईल असे आयोजक आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे