श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा): – प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांचा जन्मदिन ईद-ए-मिलाद म्हणून जगभरात साजरा केला जातो .या निमित्ताने उद्या शुक्रवारी ईद-ए-मिलादुन्नबी ची मिरवणूक सकाळी ८.३० वाजता जामा मशिदीच्या प्रांगणातून काढण्यात येणार असल्याची माहिती जामा मशिदीचे प्रमुख धर्मगुरू मौलाना मोहम्मद इमदादअली यांनी दिली.
सालाबाद प्रमाणे सदरची मिरवणूक सकाळी निघाल्यानंतर वॉर्ड नंबर दोन, मिल्लत नगर, फातिमा कॉलनी व नेहमीच्या परंपरागत मार्गावरून पुन्हा जामा मशिदीत येईल त्या ठिकाणी मिरवणुकीची सांगता होईल.त्यानंतर शुक्रवारची साप्ताहिक नमाज होईल. जुमा नमाज नंतर हजरत पैगंबरांच्या पवित्र केसाचे दर्शन करविण्यात येईल .त्याच वेळी जामा मशिदीच्या हॉलमध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे .तरी या सर्व कार्यक्रमांना सर्व मुस्लिम बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन जामा मशीद ट्रस्ट व शहरातील सर्व मशिदींचे ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे .पैगंबर जयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी शहरातील अहले सुन्नत वल जमात च्या सर्व मशिदींचे मौलाना, प्रमुख कार्यकर्ते, विविध तरुण मंडळे प्रयत्नशील आहेत.
तरी पैगंबर जयंतीची मिरवणूक व इतर सर्व धार्मिक कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन ही मौलाना मोहम्मद इमदादअली व शहरातील सर्व मशिदींचे प्रमुख धर्मगुरू यांनी केले आहे.