पारनेर(जनता आवाज वृत्तसेवा):- रयत शिक्षण संस्थेच्या कान्हुर पठारजनता विद्या मंदिर येथिल ज्येष्ठ विज्ञान शिक्षक भरत आप्पासाहेब पाचर्णे यांना अहिल्यानगर जिल्हा विज्ञान अध्यापक संघाच्या वतीने कृतिशील व उपक्रमशील विज्ञान अध्यापक व विज्ञान स्पर्धा परीक्षेत विशेष योगदानाबद्दल ‘ उत्कृष्ठ विज्ञान संघटक ‘ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार विज्ञान विषयात केलेल्या भरीव योगदानाबद्दल व विज्ञान विषयाच्या अध्यापनाबरोबरच विविध वैज्ञानिक व शैक्षणिक उपक्रमांतील सक्रिय सहभागाबद्दल प्रदान केला जातो. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील पारनेर तालुक्यातून
त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली. अहिल्यानगर येथे त्यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. शिक्षक भरत पाचर्णे यांनी मिळवलेल्या या सन्मानाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी बोडखे , रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर , जनता विद्यामंदीर कान्हूरपठार मुख्याध्यापक काळे सर , ग्रामस्थ व इतरांनी कौतूक करत अभिनंदन केले .