पारनेर(जनता आवाज वृत्तसेवा): – पारनेर तालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या देवीभोयरे येथील जगदंबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे मंगळवार दि .१६ रोजी सकाळी ९ वाजता देवीभोयरे येथे आयोजीत करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन तुकाराम बेलोटे यांनी दिली आहे .
या २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील वर्षीच्या सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करणे , सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव करणे , २०२४ – २५ या अखेरच्या वर्षाचा वार्षिक अहवाल , ताळेबंद व नफातोटा पत्रक वाचून मंजूर करणे , अंदाज पत्रकापेक्षा कमी – जास्त झालेल्या खर्चास मंजूरी देणे व चालू २०२५ – २६ करिता तयार केलेल्या अंदाजपत्रकास मंजूरी देणे , वैधानिक लेखा परीक्षक व टॅक्स ऑडीटरची नेमणूक करून मेहनता ठरवणे ,
संचालक मंडळाने सुचविलेल्या नफा वाटणीस मान्यता देणे , सहकार लेखा परीक्षकांनी दिलेल्या २०२४ – २५ चे लेखा परीक्षण अहवालाची व २०२३ – २४ ची दोष दुरुस्ती अहवालाबाबत नोंद घेणे , सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ७५ (२) मधील तरतूदीनुसार संचालक व त्यांच्या कुटुंबियांना दिलेली कर्जे वरूली प्रपत्रकाची नोंद घेणे , सभासद , कर्मचारी व संचालक मंडळ यांना प्रशिक्षण देणे , अंतर्गत लेखापरीक्षक यांची नियुक्ती व मेहनता ठरवणे , सहकार खात्याने तयार केलेले सुधारीत आदर्श उपनिधी संचालक मंडळाने सुचविलेल्या दुरुस्ती सह स्विकारण्या बाबत विचार विनिमय करणे , या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे , अशी माहिती संस्थेचे व्हाईस चेअरमन शिवाजीराव बेलोटे यांनी दिली .
सभेचे अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष तुकाराम बेलोटे यांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे , हे विषय या २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात येणार आहेत , अशी माहिती संस्थेचे मॅनेजर रावसाहेब वाढवणे यांनी दिली .