22.6 C
New York
Saturday, September 6, 2025

Buy now

spot_img
spot_img

उद्योजक प्रदीप गोरडे यांनी दिले म्हस्केवाडीतील देवस्थानांना सिमेंट बाकडे  

पारनेर(जनता आवाज वृत्तसेवा): – म्हस्केवाडीचे भूमीपुत्र व पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक प्रदीप धनंजय गोरडे यांच्यातील दानशूरतेचे दर्शन दिसून येते , त्यांनी म्हस्केवाडी येथील ३ देवस्थान चे दर्शन घेऊन नतमस्तक होण्यासाठी आलेल्या थकलेल्या भाकलेल्या भाविकांना व वयोवृध्दांना बसण्यासाठी सिमेंट चे बाकडे भेट दिल्याने समाजात अजूनही माणूसकी व दानशूरते बरोबर च माणसात ही देव असल्याचा प्रत्यय येतो .

पारनेर तालुक्यातील वारकरी संप्रदायात प्रसिद्ध असलेले वारकरी भूषण हभप धनंजय महाराज गोरडे यांचे सुपूत्र व विद्येच्या माहेरघर असलेल्या पुण्यात उद्योग – व्यवसायात प्रसिद्ध असलेले उद्योजक प्रदीप गोरडे यांनी म्हस्केवाडी येथील शिंदे मळ्यातील श्री गणेश मंदीर , पानमंद मळा येथील श्री दत्त मंदीर व भोसलेवस्तीतील श्री दत्त मंदीर , तर शिंदे मळा येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी खास बसण्यासाठी सिमेंटचे बाकडे दिल्याने ग्रामस्थांनी प्रदीप गोरडे यांनी समाजाप्रती आपण काही तरी देणे लागतो , ते ऋण फेडण्याच्या जाणिवे तून त्याची सुरुवात म्हणून त्यांनी प्रथम आपल्या मायाभूमीची निवड करत त्याची लगेच अंमलबजावणी केली .

आपल्या तील उदारतेचे प्रतीक दाखवून दिले , सामाजिक बांधलकी जोपसण्यासाठी मनातील हेतूंची लगेच अंमलबजावणी , ते ही गणेश उत्सवात श्री गणपती मंदिरां ना व काल गुरुवार ची निवड करत श्री दत्त गुरुंच्या मंदिराची निवड करत , त्याच बरोबर ज्येष्ठांना ही वयोमानानुसार शारीरिक त्रासामुळे जमिनीवर खाली बसणे शक्य होत नाही , हे ही ध्यानात घेऊन गोरडे यांनी शिंदे मळा येथे सिमेंटचे बाकडे दिल्याने देवांबरोबर च , ज्येष्ठांचे ही आशिर्वाद गोरडे यांना या निमित्ताने मिळाल्याचे समाधान मिळत आहे .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!