17 C
New York
Sunday, September 7, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्रीरामपुरातील त्या बेपत्ता तरुणाचा २ महिन्यानंतर कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह!

श्रीरामपुर(जनता आवाज वृत्तसेवा):- गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाच्या मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने श्रीरामपूर शहरात एकच खळबळ उडवून दिली आहे. पाटबंधारे विभागाच्या वसाहतीतील एका बंद आणि पडक्या खोलीत २१ वर्षीय महेश डोरले याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेह इतका कुजला होता की, तो ओळखणे अशक्य होते. पोलिसांनी अथक प्रयत्न करून तब्बल चार तासात मायताची ओळख पटवली. ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना समोर आल्याने शहरात शोककळा पसरली आहे.

५ जुलै रोजी गोंधवणी रोड, वॉर्ड नं. १ येथील रहिवासी असलेला महेश डोरले हा युवक अचानक बेपत्ता झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी ६ जुलै रोजी महेश बेपत्ता झाल्या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला, मात्र महेशचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर, दोन महिन्यांनंतर त्याचा मृतदेह पाटबंधारे विभागाच्या वसाहतीमधील एका पडक्या खोलीत आढळला. मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याने शीर धडापासून वेगळे झाले होते, हे दृश्य पाहून परिसर हादरून गेला.

या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राम शिखरे यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाच्या स्थितीमुळे त्याची ओळख पटवणे कठीण झाले होते, पण चार तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी महेश डोरलेच्या कुटुंबीयांच्या मदतीने त्याची ओळख निश्चित केली. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, महेशने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी. मात्र, मृतदेह पूर्णपणे कुजल्याने या घटनेमागे अन्य काही कारण आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!