17 C
New York
Sunday, September 7, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्रेषित महंमद पैगंबरांच्या जयंतीदिनी निघोजच्या हवलदार परिवाराने दिली श्री मळगंगा देवस्थानला देणगी

पारनेर(जनताआवाज वृत्तसेवा): – शुक्रवार दि . ५ हा मुस्लिम समाजाचे प्रेषित महंमद पैगंबर यांचा जयंती दिन , या दिवसा ला अनन्य साधारण महत्व , याच दिवशी निघोज मधील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या हवलदार परिवाराने राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या श्री मळगंगा देवस्थान ला समाजाप्रती आपण काही तरी देणे लागतो , या भावनेने ५ हजार रुपयांची देणगी देऊन मनाचा मोठे पणा सिद्ध केला . या परिवाराने निघोज परिसरात संपन्न होत असलेल्या सामाजिक कार्यक्रमात नेहमीच योगदान दिले आहे . या परिवाराचे खा . निलेश लंके यांचे खंदे समर्थक ठकाराम लंके यांनी खास कौतूक केले आहे . 

दिवंगत पापाभाई बुवाजी हवलदार , दिवंगत अब्दुलभाई फत्तुभाई हवलदार , आणि दिवंगत याकुबभाई पापाभाई हवलदार या हवलदार परिवारातील ज्येष्ठांच्या स्मरणार्थ इस्माईल हवलदार , मकबुल हवलदार , गुलाब हवलदार यांच्या हस्ते चांद हवलदार , सलीम बाबुलाल हवलदार , सलीम ईस्माईल हवलदार , अलीम हवलदार , असिम हवलदार , असिफ हवलदार , समिर हवलदार , गणी हवलदार , रफीफ हवालदार , रशिद हवलदार , मोहम्मद हवलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रेषित महंमद पैगंबर यांच्या जयंतीचे औचित्य साधत राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्री मळगंगा देवस्थान ला ५ हजार रुपये देणगी दिली . त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे .

मध्यंतरी नुकतेच या हवलदार परिवाराने श्री मळगंगा देवस्थान ला एक एल ई डी टि . व्ही भेट दिला . निघोज मधील मुस्लिम समाजाने नुकताच एक महत्त्व पूर्ण निर्णय घेतला की , दि . ५ रोजी गणपती विसर्जन व प्रेषित महंमद पैगंबर यांचा जयंती दिन एकाच दिवशी येत असल्याने जयंती चा कार्यक्रम सोमवार दि . ८ रोजी साजरा करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला . तसेच देशाचा स्वातंत्र्यदिन दि . १५ ऑगस्ट असो , वा प्रजासत्ताक दिन दि . २६ जानेवारी या दिवशी देशभर तिरंगा ध्वज फडकवला जात असतानाच निघोज येथील जामा मस्जिद मध्ये ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या उपस्थित तिरंगा ध्वज फडकवला जातो . तर श्रीराम मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहात ही अन्नदान केले जाते . असे अनेक उदाहरणे देता येईल की , निघोज मध्ये हिंदू – मुस्लिम समाज गुणा गोविंदा ने नांदत असल्याचे प्रतिक आहे .

यावेळी श्री मळगंगा देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात सहसचिव विश्वासराव शेटे , विश्वस्त व माजी ठकाराम लंके , संतोषराव रसाळ , प्रसिद्ध विधी तज्ञ ज्ञानेश्वर लामखडे , शंकर लामखडे , रमेश वरखडे व इतर मान्यवर उपस्थित होते .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!