लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-गेल्या पंचवीस वर्षांपासून अखंडपने लोणी बुद्रुक येथे विराजमान होणाऱ्या एक गाव एक गणपतीला जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते निरोप देण्यात आला.
ना.विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सन २००१ मध्ये राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे एक गाव एक गणपती हा आदर्श उपक्रम सुरू झाला होता.त्याचे अनुकरण इतरही गावांमध्ये झाले.काही गावात त्यात खंड पडला मात्र लोणी बुद्रुक येथे गेली पंचवीस वर्षे तो अखंडपणे सुरू आहे.यावर्षी या उपक्रमाचा रौप्य महोत्सव असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. गणेश मूर्ती स्थापना झाल्यानंतर प्रवरा शिक्षण संस्थेच्या शाळा,महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून त्यातून मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश दिला.
शनिवारी सौ.शालिनीताई व ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून गणरायाला अखेरचा निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या घोषणांनी लोणीचा आसमंत दणाणून गेला होता. यावेळी माजी मंत्री व जिल्हा बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील,ट्रक्स वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकुशोर राठी,सरपंच कल्पनाताई मैड,प्रवरा बँकेचे संचालक किसनराव विखे,तंटा मुक्तीचे अध्यक्ष संपतराव विखे,विकास सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव धावणे,उपाध्यक्ष नाना म्हस्के,बाजार समितीचे संचालक राहुल धावणे,उपसरपंच गणेश विखे,चांगदेव विखे,वसंतराव विखे,अनिल विखे,लक्ष्मण बनसोडे,एम वाय विखे,रंगनाथ विखे,सोपान विखे,बद्री विखे,भाऊसाहेब विखे,नवनाथ विखे,मधुकर विखे,गणेश विखे,चंद्रकांत म्हस्के,प्रवीण विखे,किशोर धावणे,धनंजय म्हस्के यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी,गणेश मंडळाचे कार्यकर्ते,ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला.
ना.विखेंचा विशेष सत्कार!
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी तातडीने शासकीय अध्यादेश काढून आरक्षणाचा मार्ग मोकळा केल्याबद्दल लोणी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या हस्ते ना.विखे पाटील यांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला.यावेळी ग्रामस्थांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या.
फोटो: लोणी बुद्रुक येथे एक गाव एक गणपतीची ना.विखे पाटील यांनी सपत्नीक पूजा करून गणरायाला निरोप दिला.