खंडाळा (जनता आवाज वृत्तसेवा):-राहाता तालुक्यातील वाकडी-ममदापूर शिवेवर असलेल्या श्री क्षेत्र रामेश्वर (महादेव मंदीर) येथे नुकताच अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी,शिवलिलामृत ग्रंथ पारायण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
ब्रम्हलीन नारायणगिरी महाराज व समर्थ किसनगिरी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने सालाबादप्रमाणे सुरु असलेल्या या सोहळ्याचे ध्वजारोहण ह.भ.प. रावसाहेब बाबा शेळके यांचे हस्ते करण्यात आले होते.दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४.३० ते ७ पर्यंत काकडा भजन, ८ ते ११ पारायण, १२ ते १ भोजन,संध्याकाळी ५ ते ७ हरिपाठ,रात्री ७ ते ९ हरिकिर्तन व नंतर महाप्रसाद असे पार पडले.
सप्ताह कालावधीत ह.भ.प.काटे महाराज,दत्तात्रय महाराज रक्टे,बाळासाहेब महाराज रंजाळे,बालकीर्तनकार पाचपुते महाराज,स्वरभास्कर अमोल महाराज गाढे,बाबा महाराज मगर,हरिशरणगिरी महाराज यांच्या कीर्तनसेवा पार पडल्या. सकाळी ९ते ११ या वेळेत ग्रंथ मिरवणूक होऊन ह.भ प. राजेश्वरगिरीजी महाराज यांचे काल्याचे किर्तन पार पडले.पद्मश्री ॲग्रो लोणी यांचे वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.