20.6 C
New York
Tuesday, September 9, 2025

Buy now

spot_img
spot_img

कलाकारांच्या मदतीसाठी सदैव कटिबध्द आ. ओगले यांची ग्वाही

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):-सलग दुसऱ्या वर्षी बाल कलाकारांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य गौरी गणेश चित्रकला स्पर्धा भरवून आपण दिलेला शब्द पाळला आहे. पालकांचेही मोठे कौतुक वाटते की, त्यांनी पाल्यांमधील कलाकार ओळखून प्रोत्साहित केले. यापुढील काळातही आपण मतदार संघातील कलाकारांच्या मदतीसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार हेमंत ओगले यांनी दिली.

साई सोशल फाऊंडेशन, तुळजा फाऊंडेशन व रंगलहरी आर्ट ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच भव्य गौरी गणेश चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी आमदार ओगले बोलत होते. मंचावर माजी उपनगराध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, ज्येष्ठ चित्रकार भरतकुमार उदावंत, रंगलहरी आर्ट ॲकॅडमीचे संचालक चित्रकार रवी भागवत, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, रितेश रोटे, पंडित बोंबले, डॉ.मच्छिंद्र त्रिभुवन, जीवन सुरूडे, अशोक उपाध्ये, रियाज पठाण, जावेद शेख, रज्याक पठाण, प्रवीण नवले, अहमदभाई जहागीरदार, सरबजीतसिंग चूग, सुनील साळवे, सेवा दलाचे सरवर अली आदी उपस्थित होते.

ससाणे म्हणाले, मुलांवर कलात्मक संस्कारकरण्यासाठी पुढील वर्षी पालकांनी त्यांच्यासोबत स्पर्धेत सहभाग घ्यावा. तरच येणारी पिढी ही संवेदनशील घडेल व उज्जवल भारत निर्माण होण्यास मदत होईल.

सचिन गुजर म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या माध्यमातून वाव मिळतो अतिशय सुंदर चित्र मुलांनी काढले अशा प्रकारच्या स्पर्धा घेणे ही काळाची गरज असल्याचे म्हटले.

ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी आमदार हेमंत उगले व युवा नेते करण सासने यांच्यासह रंग लहरी कला दालनाचे आभार मानले की त्यांच्यामुळेच रामपुरातील विद्यार्थ्यांना आपले कलागुण दाखवण्याची संधी मिळाली.

प्रास्ताविक करताना चित्रकार भागवत म्हणाले, माणूस घडण्याच्या प्रक्रियेत कला ही खूप महत्त्वाची भुमिका बजावते. स्पर्धकांच्या पालकांनी हे बरोबर हेरले आहे. त्यामुळेच आज ईतक्या मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभाग दिसला. यावेळी गुजर, चित्रकार उदावंत, मुरकुटे, बाल शाहीर ओवी काळे आदींनी मनोगते व्यक्त केली.

समारंभास अशोक उपाध्ये, भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या सचिव दिपाली ससाणे, नीती ओगले, मिनल भागवत, इंदूमती भागवत, परदेशी, ॲड. बाळासाहेब सुरूडे, काशिनाथ भागवत, दत्तात्रय रंधे, वृषाली रंधे, आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी योगीता नागले, माधुरी सोनवणे, राणी देसर्डा, ईश्वरी भागवत, अशोकराज आहेर, निलेश नागले, नकूल जेजूरकर, समीर शेख, गौरव सिकची, स्वप्निल जेजुरकर, राजेश जोंधळे, महेश दौंड, साईश भागवत, अजय धकतोडे, सनी मंडलिक , आदी प्रयत्नशील होते. निवेदक संतोष मते यांनी सूत्र संचालन केले.

चित्रकला स्पर्धेत सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेतील विजेते अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतिय व उत्तेजनार्थ दोन पुढीलप्रमाणे. खुला गट- अदित्य गुंड, उदयराज नवघने, सतिश जाधव, वेदांत भांबारे, पायल पाठक, गौरव थोरात, स्नेहल चव्हान, मोठा गट- श्रूतिका रंधे, सायली साळुंखे, अपूर्वा नांदूरकर, पुजा नागरे, गौरी भागवत. मध्यम गट- सोहम नवले, सोहम नाईक, मानसी सुरूडे, ओंकार कापुरे, सर्वेश बागडे. लहान गट- सिद्धांत आढाव, वेदश्री व्यास, आज्ञा चौधरी, माऊली लांडगे, मानस महाले. या व्यतिरिक्त ५० स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

परिक्षक म्हणून नंदकुमार लांडगे, एस. जी. नवले, एस.पी.पटारे, ए. जे. थोरात, जी. पी. बनकर, आर. एस. हिवाळे, राहुल छल्लारे, सोमनाथ पटारे आदींनी काम पाहिले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!