पारनेर(जनता आवाज वृत्तसेवा): – पारनेर तालुक्यातील कळस गावात मंगळवार दि . २ सप्टेंबर रोजी घडलेल्या दुर्देवी घटनेत कळस येथील तरूण गणेश तुळशीराम गाडगे याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेनंतर खासदार नीलेश लंके यांनी गाडगे कुटूंबाची भेट घेत त्यांना धीर दिला. वनविभागाशी संपर्क करून या कुटूंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला. वन विभागाने तात्काळ गाडगे परिवाराच्या खात्यावर १० लाख रूपये वर्ग केले असून उर्वरित रक्कम लवकरच मिळेल , असे खा. लंके यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी दत्तात्रय गाडगे, जितेश सरडे, चंद्रभान ठुबे, बाळासाहेब पुंडे, सरपंच श्रीकांत डेरे, सरपंच दिनेश चौगुले, सरपंच संतोष काटे, सरपंच दत्तु म्हस्के, सरपंच राहुल गाडगे, यांच्यासह शुभम शिरोळे, सचिन साखला, प्रसिद्ध उद्योजक किरण डेरे, जावेद कुरेशी, नरूभाई कुरेशी, गणेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य दत्तू गाडगे, नीलेश लंके प्रतिष्ठानचे निघोज गटप्रमुख सुनील गाडगे, भाऊसाहेब गाडगे, नारायण डोळस, गणेश पाडेकर, दिपक गाडगे, दत्तू वाघमारे, रंगनाथ वाघमारे, दिलीप गुंजाळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
खा. नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण २५ लाख रूपयांच्या मदतीला मंजुरी दिली. त्यातील १० लाख रूपये तातडीने आरटीजीएसद्वारे गाडगे कुटुंबाच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. उर्वरित १५ लाख रुपये ४ ते ५ दिवसांत जमा केली जाईल , असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
गावकऱ्यांनी सांगितले की, गणेश गाडगे हा अत्यंत कष्टाळू होता. शेतीसह इतर कामांतून कुटूंबाचा आधार होता. त्याच्या निधनामुळे आई-वडील, बंधू यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रसंगी शासनाकडून मिळालेली मदत ही मोठा दिलासा देणारी ठरेल. खा. नीलेश लंके म्हणाले की , हा प्रसंग केवळ गाडगे कुटुंबासाठीच नव्हे , तर संपूर्ण समाजासाठी वेदनादायी आहे. आपण सर्वांनी या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.
दुःखद घटना
आपल्याकडे कळस मधील एका तरूणाचा वन्य प्राण्याच्या हल्ल्यात जीव गेला , हे फार दुःखद आहे. अशा वेळी शासनाची जबाबदारी म्हणजे कुटुंबाला तातडीची मदत करणे. मी स्वतः त्यासाठी पहिल्या दिवशीपासून प्रयत्नशिल होतो.
खा . नीलेश लंके लोकसभा सदस्य