अहील्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- आरोग्य व्यवस्थेला बळकट करण्याचे मोठे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.आता आरोग्य सुविधा सामान्य माणसा पर्यत पोहचविण्यासाठी सेवा धर्म मानून ग्रामीण भागात काम करून स्वताला सिध्द करा असे आवाहन जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मेडीव्हीजन या वैद्यकीय क्षेत्रातील कार्यकर्त्याच्या दोन दिवसांची राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.संपूर्ण देशातून चारशे प्रतिनिधींनी परीषदेस उपस्थित असून पद्मश्रीं डॉ विठ्ठलराव विखे पाटील फौडेशनच्या कॅम्पस मध्ये
परीषदेचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे डाॅ मिलींद निकुंभ,अभाविपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री देवदत जोशी सह संघटन मंत्री बाळकृष्णजी मेडीव्हीजनचे संयोजक मौलिक ठक्कर विदर्भ प्रातांच्या सहसंयोजक सुप्रिया देशमुख शिवकुमारजी चिरगे फौडेशनचे डायरेक्टर डॉ अभिजीत दिवटे यांच्यासह परीषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,मागील दहा वर्षात आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात सर्वाधिक अर्थिक गुंतवणूक केंद्र सरकारने केली.ग्रामीण आणि शहरी भागात आरोग्य सुविधा निर्माण करतानाच लोकांना त्यांच्या घराजवळ आरोग्य सुविधा मिळतील असा प्रयत्न सरकारचा आहे.
केंद्र सरकारच्या धोरणामुळे प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय एम्सच्या धर्तीवर रूग्णालय निर्माण करण्यास मोदी सरकारने प्राधान्य दिले असून,आरोग्य क्षेत्राला विकास प्रक्रीयेशी जोडल्यामुळे आरोग्य सुविधांचे बळकटीकरण होवू शकले.
वैद्यकीय क्षेत्रात आपण आपले करीअर घडवत आहात मात्र हे क्षेत्र सेवेचे आहे याचा विसर पडू देवू नका,आज ग्रामीण भागात अधिकचे काम करण्याची गरज आहे.वनवासी भाग तसेच कुपोषित बालकांच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्याचे सर्वात मोठे आहे.यासाठी काम करण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते शिक्षण क्षेत्राला संस्कृती परंपरा आणि राष्ट्रीय विचारधारेशी जोडून केवळ कार्यकर्ते नाहीतर आदर्श नागरीक निर्माण करण्याचे काम करीत आहे.सेवा कार्याच्या माध्यामातून परीषेदेने ७७वर्षाच्या केलेल्या यशस्वी वाटचालीचे मंत्री विखे पाटील यांनी कौतुक केले.
याप्रसंगी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे डाॅ मिलींद निकुंभ मेडीव्हीजनचे संयोजक मौलिक ठक्कर यांची भाषण झाली.