नेवासा (जनता आवाज वृत्तसेवा):-सलाबतपुर (ता. नेवासा) येथे काल रात्री झालेल्या 132.7 मिमी अतिवृष्टीमुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. सलाबतपूर झोपडपट्टी परिसर तसेच खडका फाटा–शिरसगाव रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला. झोपडपट्टी परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मका, बाजरी, कपाशी आदी पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, याची पाहणी तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन केली.
यावेळी आमदार लंघे पाटील यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून बाधितांना त्वरित मदत देण्याचे आदेश दिले. पाहणी दरम्यान प्रशासकीय तलाठी शेख भाऊसाहेब व ग्रामसेवक भिसे भाऊसाहेब उपस्थित होते.
यावेळी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळे पाटील,सलाबतपुर ग्रामपंचायतीचे सरपंच अझर भाई शेख, अश्फाक शेख, अशोकराव दाने, कैलास निकम, संभाजी पोटे, जावेद फिटर, अंकुश काळे, ज्ञानेश्वर कदम, सागर धाडगे, राहुल काळे, सुनील नजन, बबलू दिवाकर, बबनराव तांबे, अशोकराव धाडगे, शरद कुराडे, राजेंद्र मुंडलिक, बाळासाहेब निकम तसेच परिसरातील महिला माता-भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.