पारनेर(जनता आवाज वृत्तसेवा): – पारनेर तालुक्यातील अळकुटी सारख्या ग्रामीण भागात पद्मभूषण खासदार दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांनी वरिष्ठ महाविद्यालयाची स्थापना करून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने उच्च शिक्षणाचे रोपटे लावले होते , त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. गेली २० वर्षांच्या कालखंडात महाविद्यालयाच्या कामगिरीचा आलेख हा सातत्याने उंचावता राहिलेला आहे. संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकूणच अळकुटी महाविद्यालयाचे शैक्षणिक कार्य गौरवास्पद आहे , असे गौरवोद्गार अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अळकुटी महाविद्यालय येथे पाण्याच्या तलावाच्या खोलीकरण, रुंदीकरण व विस्तारीकरणाचा शुभारंभ सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला, याप्रसंगी सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी संपूर्ण महाविद्यालय परिसराची पाहणी करताना वृक्ष लागवड, क्रीडांगण, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील पदवी व पदव्युत्तर वर्गांच्या प्रवेश व शैक्षणिक उपक्रम याबद्दलची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य तथा पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बाबर, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य भाऊसाहेब डेरे, डॉ. बाबुराव म्हस्के, राळेगण थेरपाळचे चेअरमन भरतराव शितोळे, उपप्राचार्य अमोल नालकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.