spot_img
spot_img

सीना नदीत सोडलेल्या मुख्य ड्रेनेज लाईनचा प्रवाह मोकळा आ. संग्राम जगताप यांनी स्वतः सीना नदीपात्रात उतरून केली पाहणी

अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्याची समस्या उद्भवली होती. स्टेशन रोडवरील कोठी परिसरातून वाहणारी मुख्य गटार ड्रेनेजलाईनचा टेल सीना नदी पात्रातील शेवटचा भाग तुंबला होता. या समस्येची आ. संग्राम जगताप यांनी आज स्वतः सीना नदीपात्रात उतरून पाहणी करून अत्याधुनिक सक्शन मशीनद्वारे स्वच्छता करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या.

त्यामुळे संपूर्ण मुख्य ड्रेनेज लाईनचा प्रवाह सुरळीत झाला. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, माजी नगरसेवक संजय चोपडा, प्रकाश भागानगरे, मनपा अभियंता श्रीकांत निंबाळकर, स्वच्छता निरीक्षक ऋषिकेश भालेराव आदी उपस्थित होते.

कोठी परिसरापासून सुरू झालेल्या या १२ शे एमएम व्यासाच्या मुख्य ड्रेनेज गटार लाईन वर ठिकठिकाणी अतिक्रमणे झालेली होती. त्यामुळे पावसाच्या पाण्यासह माती व गाळ मुख्य ड्रेनेज लाईन मध्ये उतरला होता. हा गाळ टेल शेवटच्या भागात साचून मुख्य प्रवाहाला अडथळा निर्माण झाला होता. याचबरोबर नदीपात्रातील टेल शेवटच्या भागाजवळ काही अज्ञात लोकांनी बांधकामाचे डेब्रिज ट्रॅक्टरद्वारे आणून टाकल्यामुळे देखील संपूर्ण ड्रेनेज लाईन चोकअप होण्याची समस्या उद्भवली होती, त्यामुळे आज आमदार संग्राम जगताप यांनी स्वतः सीना नदी लोखंडी पुलाजवळ उभे राहून महापालिका प्रशासनाला सूचना देऊन ही समस्या कायमस्वरूपी सोडवली आहे. त्यामुळे कोठी परिसर, माळीवाडा परिसर, राऊत मळा, अरिहंत कॉलनी, आदर्श कॉलनी व परिसर, अजय गॅस मागील परिसर, मार्केट यार्ड, प्रभाग क्रमांक 13 व 14 मध्ये उद्भवणारी समस्या कायमस्वरूपी दूर झाली आहे.

सीना नदी पात्रात बांधकामाचे वेस्टेज डेब्रिज तसेच अन्य कचरा टाकता येऊ नये म्हणून लोखंडी पुलाशेजारील भाग कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात या ठिकाणी डेब्रिज, टाकाऊ वस्तु, कचरा आणून टाकल्यास त्यांच्यावर दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाने यावेळी सांगितले. 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!