spot_img
spot_img

शिर्डी शहरामध्ये मोबाईल शॉपी फोडणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई

शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):-शिर्डी शहरामध्ये मोबाईल शॉपी फोडणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई केली आहे.

प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दि. 22 ते दि. 23 रोजीचे दरम्यान फिर्यादी श्री दिपक रावसाहेब गोंदकर( रा. दत्तनगर, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) यांचे साई समर्थ टेलिकॉम नावाचे मोबाईल शॉपी दुकानाचे शटर कोणीतरी अज्ञात चोरट्याने उचकटुन दुकानातील 1,62,400/- रुपये किमतीचे विविध कंपन्याचे मोबाईल चोरुन नेले आहेत. सदर घटनेबाबत शिर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 904/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(4), 305 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर नमुद गुन्हा ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार, राहुल द्वारके, विजय पवार, सुनिल मालणकर, रमिझराजा आतार, भगवान धुळे भेट देवुन पाहणी केली होती.

वर नमुद पथक हे दिनांक 29 रोजी अशा प्रकारे गुन्हे करणारे आरोपींची व्यवसायीक कौशल्याचे आधारे व गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढत असतांना पथकास एक इसम शिर्डी ते सिन्नर जाणारे रस्त्यावर समृध्दी महामार्गाचे कडेला एक संशयीत इसम मोबाईल असलेले बॉक्स घेवुन फिरत असल्याची माहिती मिळाली.

पथकाने तात्काळ बातमीतील ठिकाणी जावुन खात्री करुन इसम नामे मनोज यशवंत भोये (वय 20 वर्षे, रा. घोडांबे, ता. सुरगाणा, जि. नाशिक) यास ताब्यात घेवुन त्याचेकडे असल्याचे पिशवीतील मोबाईलची पाहणी करता सदरचे मोबाईल हे वर नमुद शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरी गेलेले मोबाईल असल्याची खात्री झाली.

आरोपी नामे मनोज यशवंत भोये याचे झडतीमध्ये विविध कंपन्याचे 1,03,000/- रुपये किमतीचे एकुण 09 मोबाईल व एक डेमो मोबाईल जप्त करण्यात आले आहे. ताब्यातील आरोपीस शिर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 904/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(4), 305 (अ) प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई . सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!