श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आमदार हेमंत ओगले यांनी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी , कर्मचारी आणि पालिकेच्या सफाई कामगारांसोबत श्रीरामपूर येथील बस स्थानक व परिसर स्वच्छ केला आहे.
याबाबत असे की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आमदार हेमंत ओगले यांनी स्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते त्यामध्ये प्रामुख्याने नगरपालिका व बस स्थानक या सार्वजनिक ठिकाणांचा समावेश करण्यात आला होता. त्या अनुषंगाने आमदार ओगले यांनी सकाळीच स्वतः झाडू हातात घेत नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी समवेत बस स्टॅन्ड परिसर स्वच्छ केला. यावेळी आमदार ओगले म्हणाले की, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवणे ही आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी असून प्रत्येकाने याचे भान ठेवल्यास निश्चितच आपला परिसर स्वच्छ व सुंदर बनेल. सफाई कर्मचारी हेदेखील माणसंच आहेत ही जाणीव ठेवणे गरजेचे आहे. यापुढील काळात देखील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले जाणार असून त्याकरिता विविध सामाजिक संघटनांचे देखील मदत घेतली जाईल असे आमदार ओगले म्हणाले. दरम्यान आमदार ओगले यांनी नुसताच फोटो सेशनचा हार्ड न करता सफाई कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने सुमारे दोन तास भर परिसराची साफसफाई केली.
यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी कर्मचारी तसेच श्रीरामपूर नगरपरिषदेचे आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या स्वच्छता अभियान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आ. ओगलेंचा मॉर्निंग वॉक… नागरिकांना स्व. ससाणे यांची आठवण
आ. हेमंत ओगले शहरात मॉर्निंग वॉक साठी दररोज वेगवेगळ्या भागांमध्ये जातात त्यामुळे तेथील अडचणी तात्काळ लक्षात येतात. आ. ओगले यांच्या या कार्यामुळे श्रीरामपुरातील जनेतला माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे यांची आठवण आल्या शिवाय राहत नाही.



