15.4 C
New York
Wednesday, October 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

कोपरगाव नगरपालिका निवडणूक 2025 प्रभागनिहाय महिला व पुरुष आरक्षण जाहीर

कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा) :- येत्या कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2025 मधील प्रभागनिहाय आरक्षणाची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 15 प्रभागांपैकी महिला व पुरुषांसाठी विविध प्रवर्गांनुसार (General, SC, OBC) आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

कोपरगाव तालुक्याच्या राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोपरगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरिता नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी उमेदवाराकरीता आरक्षण नुकतेच जाहीर झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला तर आज बुधवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी ११.३० वाजता सायली सोळंके निवासी उपजिल्हाधिकारी भुसंपादन विभाग अहिल्यानगर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सुहास जगताप प्रशासक तथा मुख्याधिकारी कोपरगाव नगर परिषदेच तसेच अश्विनी पिंगळ सहाय्यक रचनाकार किरण जोशी सहाय्यक रचना विभाग रश्मी प्रधान रचना सहाय्यक मनोज कुमार पापडीवाल कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये १५ प्रभागातील नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

जाहीर झालेल्या यादीनुसार —

प्रभाग क्र. अ प्रवर्ग ब प्रवर्ग

1 जनरल महिला जनरल पुरुष

2 एस.सी. पुरुष जनरल महिला

3 ओ.बी.सी. महिला जनरल पुरुष

4 ओ.बी.सी. महिला जनरल पुरुष

5 एस.सी. पुरुष जनरल महिला

6 ओ.बी.सी. महिला जनरल पुरुष

7 ओ.बी.सी. पुरुष जनरल महिला

8 एस.सी. महिला जनरल पुरुष

9 एस.सी. पुरुष जनरल महिला

10 ओ.बी.सी. पुरुष जनरल महिला

11 एस.सी. महिला जनरल पुरुष

12 ओ.बी.सी. महिला जनरल पुरुष

13 ओ.बी.सी. पुरुष जनरल महिला

14 ओ.बी.सी. पुरुष जनरल महिला

15 एस.सी. महिला जनरल पुरुष

या आरक्षण योजनेत महिलांसाठी प्रभाग क्रमांक 1, 3, 4, 6, 8, 11, 12 व 15 आरक्षित आहेत. तसेच अनुसूचित जाती व इतर मागास प्रवर्गांसाठीही प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.तर जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण वर हरकती व सूचना ९ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सूचना अथवा हरकती सादर कराव्यात असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.

यादी जाहीर झाल्यानंतर स्थानिक राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागानुसार निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. काही प्रभागांत महिलांसाठी राखीव जागा असल्याने अनेक नवीन महिला चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता पुढील टप्प्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन नामनिर्देशन प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!