श्रीरामपुर (जनता आवाज वृत्तसेवा):-नगरपालिकेच्या आगामी होणाऱ्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाची सोडत मागील आठवड्यात मुंबईत जाहीर झाल्यानंतर शहरातील प्रभाग निहाय आरक्षणाची सोडत काल प्रांत अधिकारी कार्यालयात काढण्यात आली यामध्ये अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,नागरिकांचा मागास प्रवर्गव सर्वसाधारण महिला आदी जागांवर आरक्षणासाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या.याप्रसंगी विविध राजकीय पक्षांचे पुढारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
प्रांत अधिकारी किरण सावंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय नियोजन पूर्वक ही आरक्षण सोडत काढली.
श्रीरामपूर नगरपालिकेचे एकूण 17 प्रभाग असून सदस्य संख्या 34 आहे यापैकी अनुसूचित जातीचे सहा प्रभाग लोकसंख्येनिहाय निश्चित करण्यात आले होते त्यातील तीन जागा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी तर तीन जागा अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी चिठ्ठ काढण्यात आल्या अनुसूचित जमातीसाठी प्रभाग 13 मध्ये या प्रवर्गाची सर्वाधिक लोकसंख्या असल्याने तो निश्चित करण्यात आला येथे मागील वेळी पुरुषाचे आरक्षण होते त्यामुळे यावेळी अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले.
नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी एकूण नऊ जागा होत्या त्यातील पाच जागा महिलांसाठी उच्चार जागा पुरुष वर्गासाठी आरक्षित झाल्या प्रभाग 15 हा सर्वसाधारण राहिला असून येथे दोन्ही जागा या ओपनच्या आहेत या जागेवर महिला आणि पुरुष कुणीही उभे राहू शकतो अशी माहिती यावेळी देण्यात आली.
काल काढण्यात आलेल्या आरक्षण सोडते नुसार शहरातील एकूण 34 जागांचे आरक्षण याप्रमाणे आहे-
अनुसूचित जाती महिला-प्रभाग क्रमांक 2,3,10
अनुसूचित जाती सर्वसाधारण-
प्रभाग क्रमांक 7,12,14
अनुसूचित जमाती महिला-प्रभाग क्रमांक 13
नागरिकांचा मागास प्रवर्ग-
महिला – 5,8,11,16,17
पुरुष – 1,4,6,9
प्रभाग क्रमांक 15 च्या दोन्ही जागा या सर्वसाधारण असून यापैकी एक महिला व एक पुरुष आहे.
सर्वसाधारण महिलांसाठी- प्रभाग क्रमांक – 1,4,6,7,9,12,14,15.
सर्वसाधारण जागा –
2,3,5,8,10,11,13,15,16,17.
याप्रमाणे एकूण 34 जागा चे आरक्षण निश्चित झाले आहेत.
काल झालेल्या सोडतीमुळे अनेक इच्छुकांचे गणित बिघडले आहे.ज्यांना सर्वसाधारण भागाची अपेक्षा होती त्यांच्या भागामध्ये महिला किंवा नागरिकाच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षण पडले आहे त्यामुळे ते आता इतर ठिकाणी नशीब आजमावण्याच्या तयारीत आहे. काही भागांमध्ये दोन्ही जागांवर आरक्षण पडल्याने या भागातील खुल्या प्रवर्गातील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये लढत होणार असून स्थानिक पातळीवर मात्र काही ठिकाणी एकमत होण्याची शक्यता नसल्याने स्वतंत्रपणे लढण्याची देखील तयारी प्रत्येक पक्षाने केल्याचे आजच्या चर्चेत दिसून आले.
दरम्यान श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण म्हणजे खुले असल्याने यावेळी मोठी चुरस आहे.युती व आघाडीतील प्रत्येक पक्षाकडे नगराध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवार आहेत मात्र तिकीट वाटपात ही जागा ज्या पक्षाला जाईल त्या पक्षाला इतर पक्षातील कार्यकर्ते किंवा नेतेमंडळी सहकार्य करणार का की स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे करणार याबाबत वेगवेगळे तर्क विचार कर लढविण्यात येत आहे.
काल जाहीर झालेल्या जाहीर झालेल्या या सोडतीमुळे आता प्रत्येक प्रभागातून संवर्गनिहाय उमेदवार निश्चित करण्याबरोबरच नगराध्यक्ष पदाला सक्षम उमेदवार देऊन नगरपालिकेची सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली असल्याचे दिसून येत आहे.