लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- सध्या राज्यामध्ये गुन्हेगारीचा संख्या वाढत असून असाच एक प्रकार समोर आला आहे.घरमालक बऱ्याचदा बाहेरगावी जायचे असल्यास भाडेकरूलाच लक्ष ठेवायला सांगतात. पण सगळेच भाडेकरू चांगले नसतात.राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे भाडेकरुच घरफोड्या निघाल्याने खळबळ उडाली आहे.
राहत्या तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील चित्रालाय सिनेमागृहालगत रमेश जगन्नाथ विखे यांचे घर आहे.त्यांच्या खोल्यामध्ये शिर्डी येथील अक्षय सुरेश गायकवाड हा भाडेकरू म्हणून रहातो. २ ऑक्टोबर रोजी विखे यांना बाहेरगावी कामानिमित्त जायचे असल्याने त्यांनी घराला कुलूप लावून सकाळीच निघून गेले.सायंकाळी घरी आले तेंव्हा त्यांना धक्काच बसला.घराचे कुलूप डुप्लिकेट चावीने उघडून त्यांचे कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले.
लोणी बुद्रुक येथील रमेश विखे तातडीने लोणी पोलीस ठाण्यात पोहचले. पोलीस अधिकारी कैलास वाघ यांना घटना सांगितली आणि आरोपी शोधन्याची चक्रे वेगाने फिरली.अल्पावधीत आरोपी शोधून त्याने चोरून नेलेल्या ६० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांपैकी ५० हजारांची दागिने त्याच्याकडून हस्तगत केली. उर्वरित दागिन्यांचा शोध घेण्यासाठी आरोपीला न्यायालयात हजर करून दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळवली.
या घटनेमुळे लोणी सारख्या गावात अनेक भाडेकरू राहतात.त्यांच्यावर विश्वास ठेवतात घरमालकांना विचार करावा लागेल. घरमालकानी भाडेकरूंची संपूर्ण माहिती ठेवावी.त्यांचे आधारकार्ड घ्यावे व पार्श्वभूमी तपासून घर भाड्याने द्यावे असे आवाहन लोणी पोलिसांनी केले आहे.
सध्या लोणी गावमध्ये ही गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून पोलीस प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष द्यावे. रात्रीच्या वेळी ग्रस्तच प्रमाण वाढावे . अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे.