श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- हिंदू असल्याचे नाव सांगून एका युवतीवर अत्याचार केल्याची घटना श्रीरामपूर शहरात घडली असून या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर येथे एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका आठरा वर्षीय मुलीची एक-दिड वर्षापूर्वी इंस्टा अकाउंटवर विरु यादव या युवकाशी ओळख झाली. तिने 2-3 महिने वरील इसमासोबत इनस्टावर चॅटिंग केली. चॅटींग वरुन तो हिंदू नसुन मुस्लिम असल्याचे समजले. त्याचे नाव शाहीद शहा असे असल्याचे माझे ध्यानात आले म्हणून तिने त्याच्याशी चँटीग बंद केले.
त्यानंतर या मुलाचा तिला व्हॉटस ॲपवर हा मॅसेज आला. त्यावेळी समोरील व्यक्तीने त्याचे नाव विरु यादव असे सांगितले. त्यावेळी या मुलीने त्याला तू हिंदु नसुन मुस्लिम आहेस. मला त्रास देण्याचा प्रयत्न करु नकोस, असे त्याला बजावले. त्यानंतर देखील शाहीद शहा हा व्हॉटसपवर वारंवार चॅटिंग करु लागला व मला एक वेळ तुला भेटायचे आहे. असे सारखा म्हणू लागला. मी त्याला होकार देवून त्याला श्रीरामपुर शहर- नेवासा रोडवरील कॅफेत भेटले. त्यावेळी त्याने मला प्रेमाची गळ घातली. परंतु तिने तो मुस्लिम असल्याने त्यांनी लव जिहादचे नावाने मुलांना फसवुन प्रेमाच्या जाळयात ओढण्याचे काम करतात. तिने त्याला असे सांगुन त्याला स्पष्ट नकार दिला होता. तरी देखील तो मला कॉल करत मला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करु लागला.
आज दि. 10 रोजी त्याने मला पुन्हा भेटण्यास बोलविले. या ठिकाणी मला लज्जा होईल, असे वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले असून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहे.