13.5 C
New York
Tuesday, October 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

आजचे राशी भविष्य, आज आपला दिवस कसा जाणार?

आजचे राशी भविष्य

मेष –

आज आपले मन वैचारिक स्तरावर मानसिक ताण अनुभवेल . अधीक संवेदनशीलतेमुळे मन हळवे बनेल. इतरांशी वाद-विवाद टाळा. आप्तेष्टांचे मन दुखावेल. आपला अपमान होणारे प्रसंग घडू नयेत याकडे लक्ष द्या.

वृषभ –

प्रारंभी काही अडचणी आल्या तरी आर्थिक नियोजन पूर्ण होईल . मित्र व हितचिंतकांच्या भेटीने आनंद होईल. व्यवसायात सहकार्य लाभेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. धनसंचय काळजीपूर्वक करा. नवकार्याचा प्रारंभ करू शकाल.

मिथुन –

 आपला दिनारंभ शारीरिक व मानसिक स्वास्थ्याने होईल. आप्तेष्टांसमवेत वेळ आनंदात जाईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक लाभ होईल. दुपारनंतर आर्थिक नियोजन बिनसले आहे असे वाटेल व नंतर पूर्ण होत आहे असे वाटेल. पैशांचे व्यवहार जपून करा. सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल.

कर्क –

आज उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. डोळ्यांचा त्रास संभवतो. मानसिक चिंता पण असेल. बोलण्या- वागण्या कडे लक्ष द्या. अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्या. दुपारनंतर समस्या कमी होतील. आर्थिक लाभ होतील. शारीरिक व मानसिक स्थिति सुधारेल. घरगुती वातावरण आनंदी राहील. मनातील नकारात्मकता काढून टाकण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत.

सिंह –

आज आपल्या मनातील आवेश आणि राग यांमुजे इतरांशी जपून व्यवहार करा. आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टिने खराबच. मनात काळजी राहील. घरातील लोकांशी कठोरतेने वागाल. दुपारनंतर मन शांत होईल परिवारासह एकत्र खाण्या-पिण्याचा आनंद घ्याल. तब्बेतही सुधारेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

कन्या –

आज सकाळचा प्रहर आपणाला आनंददायी आणि लाभदायी आहे. सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. येणी वसूल होतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. दुपारनंतर परिस्थिती प्रतिकूल बनेल. आनंदी मन अस्वस्थ राहील. तब्बेतही ठीक नेसल. बोलण्यावर संयम ठेवा. असंयमाने कोणाशी वाद होऊ शकतात. देवस्मरण आणि आध्यात्मिक विचार मनाला शांती देतील.

तुळ –

आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. नोकरी- व्यवसायात उत्साहाने काम कराल. पदोन्नती मिळेल. शासकीय कामे सहज पार पडतील. सामाजिक दृष्टिकोनातून आपली प्रतिष्ठा वाढेल. धनप्राप्तीसाठी अनुकूल काळ. पत्नी आणि संततीकडून लाभ होईल. मित्रांच्या भेटीने आनंद होईल. उत्पन्न वाढीची शक्यता

वृश्चिक –

 विरोधक आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी वादविवाद करू नका. नोकरी- व्यवसायात प्रतिकूल परिस्थिती. संततीबरोबर मतभेदाची शक्यता. दुपारनंतर घर, नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी सर्वांचा दृष्टिकोन नकारात्मक राहील. संततीची काळजी राहील. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. शासकीय कामे पूर्ण होतील. नोकरी व्यवसायात बढतीचे योग आहेत.

 

धनू –

 आज आपणाला सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. संतापामुळे हानी होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. नोकरी व्यवसायात सहकार्यान्ची भूमिका नकारात्मक राहील. संततीच्या समस्यांमुळे काळजी वाटेल. प्रतिस्पर्धी आणि विरोधकांशी जपून वागा. महत्वाच्या कामाचा निर्णय लांबणीवर टाका. नवीन कार्यारंभ करू नका. असा गणेशजींचा सल्ला आहे.

 

मकर –

आज प्रिय व्यक्ति बरोबर फिरणे आणि खाण्यापिण्याचा अनुभव ध्याल. वाहन सुख तसेच मानससम्मान मिळेल. परंतु दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. रागाचे प्रमाण वाढेल. कुटुंबीय आणि सहकारी यांचे मन दुखावले जाईल. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा श्रीगणेशजींचा सल्ला आहे.

 

कुंभ –

आज आपणांस कार्य सफलता आणि यश-कीर्ति मिळेल . तन- मन स्वस्थ राहील. सामाजिक मान- सम्मान वाढेल. दुपारनंतर मनोरंजनाचे कार्यक्रम आखाल. त्यात आप्तेष्टांना सहभागी करून घ्याल.

 

मीन –

 आजचा आपला दिवस खूप चांगला जाईल. मित्र भेटीने आनंद होईल. विद्यार्थ्यान्साठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तींच्या भेटीने आनंद वाटेल घरात सुखा- समाधानाचे वातावरण राहील. दुपारनंतर आर्थिक लाभाची शक्यता. स्वभावात रागीटपणा वाढेल. म्हणून मनावर आणि बोलण्यावर संयम ठेवा. विरोधकांवर मात कराल. अपूर्ण कामे पूर्ण होतील.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!