अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा):-राज्याचे माजी मंत्री आणि नगर – राहुरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यात निधन झालं.
कामाचा आमदार आणि अफाट जनसंपर्क असलेला नेता आज (दि. १७) नगर जिल्ह्यानं गमावला आहे. आमदार कर्डिले यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता बुऱ्हानगरच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, आमदार कर्डिले यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण नगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.. आमदार कै.कर्डिले हे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे तर अक्षय कर्डिले यांचे वडील होते. आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.