शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- शिर्डी, ता. राहाता येथे घरफोडी करणारा आरोपी धुळे येथुन ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई यश आले आहे.
सविस्तर अशी की, फिर्यादी दत्तात्रय विश्वनाथ जोशी वय – 67 वर्ष रा. गणेशवाडी, गोविंदनगर शिर्डी ता.राहाता हे कामानिमित्त मुंबई येथे गेले असता दिनांक 24/09/2025 रोजी रात्री 11/00 वा ते दिनांक 25/09/2025 रोजीचे सकाळी 07/00 वा. चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचा दरवाजाचा कशाचे तरी सहाय्याने उघडुन घरातील 2,60,000/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेलेले आहे. सदर घरफोडीचे घटनेबाबत शिर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. 907/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331 (4), 305(a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मा. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिले होते.
वर नमुद सुचनेनुसार पो.नि. किरणकुमार कबाडी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि.दिपक मेढे, पोलीस अंमलदार विजय पवार, रमिझराजा आत्तार यांचे पथक तयार करुन आरोपीचे शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.
पथकाने घटनाठिकाणी भेट देवुन सदर घटना ठिकणीचे आजुबाजुला असलेले सी. सी. टि. व्ही. फुटेज चेक करुन अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपींची माहिती संकलित करुन त्यांचे गुन्हेगारी पार्श्वभुमीचा अभ्यास केला. सदर माहितीचे आधारे वरील दाखल गुन्हा हा आरोपी नामे पर्वतसिंग दिलीपसिंग सिकलीकर रा.एकतानगर नंदुरबार याने केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीबाबत माहिती काढत असतांना पथकास माहिती मिळाली की, सदरचा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन तो सध्या धुळे जिल्ह्यामध्ये राहत असले बाबत माहिती मिळाल्याने दि. 18 रोजी पथकाने धुळे जिल्हा पोलीसांना सदर आरोपी बाबत माहिती काढुन कळविणे बाबत सांगितले असता. निजामपुर पोलीस स्टेशन, जि. धुळे यांचेकडुन माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी नामे पर्वतसिंग दिलीपसिंग सिकलीकर रा.एकतानगर नंदुरबार याचेविरुध्द निजामपुर पोलीस स्टेशन गु. र. नं. 272/2025 महाराष्ट्र पोलीस अधिनिय कलम 122 प्रमाणे कारवाई करुन त्यास ताब्यात घेतले असल्याचे कळविल्याने पथकाने तात्काळ निजामपुर पोलीस स्टेशन धुळे येथे जावुन आरोपी नामे पर्वतसिंग दिलीपसिंग सिकलीकर वय – (32 वर्षे रा. एकतानगर नंदुरबार) त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विश्वासात घेवुन तपास करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिली आहे.
आरोपी नामे पर्वतसिंग दिलीपसिंग सिकलीकर (वय – 32 वर्षे रा. एकतानगर नंदुरबार) हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेविरुध्द यापुर्वी बीड, नंदुरबार जिल्ह्यामध्ये घरफोडी, नकली चलनी नोटा, चोरी चे खालीलप्रमाणे 3 गुन्हे दाखल आहेत.
अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम बीड शहर, जि. बीड 142/2013 भादवि क 379,34जवाहरनगर, जि. नंदुरबार 165/2012 भादविक 380नंदुरबार उपनगर जि. नंदुरबार 418/2024 बी.एन.एस. क. 180(2),191(2), 191(3), 190, 118(1), 115(2), 333, 352, 351(2) आर्म ऍ़क्ट 4/25 नमुद आरोपीस शिर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 907/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331 (4), 305(a) प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी हजर करण्यात आले असुन, पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.