राहाता(जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील साकुरी शिवारात काल, मंगळवारी सकाळी राहाता येथील युवकाचा पेरूच्या बागेच्या शेडमध्ये मृतदेह आढळून आला असून राहाता पोलिसात सदर घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की साकुरी येथील मुकुंद दंडवते यांच्या पेरूच्या बागेमध्ये असलेल्या शेडमध्ये मयत विकी भालेराव मृतदेह आढळून आला. विकी घरी न आल्याने मयताच्या भावाने आजूबाजूला तसेच त्याच्या सासुरवाडीला चौकशी केली असता त्या ठिकाणी आढळून आला नाही.
२८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मुकंद दंडवते यांनी मयत असलेल्या व्यक्तीच्या भावाला तुझा भाऊ विकी हा दारु पिवुन माझ्या पेरुच्या बागेच्या शेडमध्ये पडलेला आहे असे सांगितल्यानंतर मयत व्यक्तीच्या भावाने ताबडतोब साकुरी पेरूच्या बागेत जाऊन पहिले असता. त्यांचा भाऊ विकी तेथे मयत अवस्थेत दिसला त्याचा मोबाईल बाजुला पडलेला होता. त्यांनी त्याला हात लावुन हलवण्याचा प्रयत्न केला असता त्याने कोणत्याही प्रकारची हालचाल केली नाही.
सदर घडलेले घटनेची माहिती राहाता पोलीस स्टेशन यांना देण्यात आली राहाता पोलिसांनी घडलेल्या ठिकाणी जाऊन पंचनामा करून मयत विकी भालेराव यास ग्रामीण रुग्णालय राहाता आणले असता त्यास डॉक्टरांनी तपासानी करून मयत घोषीत केले आहे. याप्रकरणी राहाता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा करुन पुढील तपास पोहेको डी. के. अभंग करीत आहे.




