श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):- नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला जोरदार धक्का बसला असून भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या नगरसेवकांचा आणि शहराध्यक्षांचा काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामधे ज्येष्ठ नगरसेवक शामलिंग शिंदे, गटनेते राजेंद्र पवार सर, रईस जहागिरदार, राष्ट्रवादी शहर काँग्रेसच्या फादर बॉडीचे शहराध्यक्ष अभिजित लिप्टे, नगरसेविका सौ प्रणिती दिपक चव्हाण, मर्चंटचे संचालक दत्तात्रय धालपे, योगेश जाधव, निलेश बोरावके यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.
यावेळी युवा नेते करण ससाणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, सभापती सुधीर नवले, अंजुमभाई शेख, मुज्जफर शेख, मुन्ना पठाण, रितेश रोटे, कलीम कुरेशी ,के.सी शेळके, निलेश नागले, रज्जक पठाण , नाजिरभाई व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, श्रीरामपूर ची जनता स्वाभिमानी असून येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होईल. स्व. जयंतराव ससाने यांच्या कार्यकाळात श्रीरामपूर नगर परिषदेचा नावलौकिक हा राज्यात होता मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाले तो काळ श्रीरामपूर साठी सुवर्णकाळ होता परंतु काही विघ्न संतोषी लोकांना ते देखवले नाही त्यांनी श्रीरामपूर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला परंतु विधानसभा निवडणुकीच्या वेळी श्रीरामपूरकरांनी आ.हेमंत ओगले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणत त्यांना धडा शिकवला त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीत श्रीरामपूर नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल आणि मोठ्या प्रमाणावर नगरसेवक निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार हेमंत ओगले यांनी यावेळी काँग्रेस पक्षात सगळ्यांचे स्वागत केले व येणाऱ्या काळात स्व. ससाणे साहेबांन प्रमाने सर्वांना सोबत घेऊन काम करु असे सांगितले.
करण ससाणे म्हणाले की, आपन सगळ्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवला त्याबद्दल आपले आभारी आहे येत्या काळात बरोबरीने काम करु असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की , हे प्रवेश शुभ शकुन असून श्रीरामपूरची विस्कटलेली घडी बसविण्याकरिता या सर्व सहकाऱ्यांचा फायदा होईल श्रीरामपूर येथील गुंडगिरी आणि नशेखोरी संपविणे हा निवडणुकीतील मुख्य अजेंडा आहे असे देखील गुजर यांनी म्हटले. केले तर आभार राजेंद्र पवार सर यांनी मानले.यावेळी आनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.



