श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा): – राज्याच्या नगर विकास विभागातील राज्यभरात कार्यरत महानगरपालिका व नगरपालिकांचे अतिरिक्त आयुक्त,उपायुक्त व मुख्याधिकारी या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट-अ/ सहायक आयुक्त, गट-अ संवर्गातून मुख्याधिकारी गट-अ (निवडश्रेणी)/ उपायुक्त, गट-अ संवर्गात पदोन्नती झाले असून यामुळे राज्यातील काही अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या देखील झाल्या आहेत.
यामध्ये श्रीरामपूर नगरपालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांची आहे त्या जागेवर पदोन्नती झाली असून श्रीरामपूरचे माजी मुख्याधिकारी,मालेगाव महानगरपालिकेचे विद्यमान उपायुक्त गणेश शिंदे यांची अमळनेर जिल्हा जळगाव येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे.
राज्यभरातील ६५ मुख्याधिकारी उपायुक्त अतिरिक्त आयुक्त यांच्या पदोन्नतीचे आदेश काल नगर विकास विभागाचे उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांच्या सहीने निर्गमित करण्यात आले आहे.गेल्या अनेक महिने रखडलेल्या या पदोन्नत्याचे आदेश काल नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दुपारी मंत्रालयातून जारी करण्यात आले.
श्री घोलप व श्री शिंदे यांची पदोन्नती झाल्याबद्दल राज्यभरातील नगरपालिका वर्तुळातील त्यांचे मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.



