spot_img
spot_img

अक्षय कर्डीले यांच्या पाठीशी सर्वांनी एकदिलाने उभे राहा – ना. राधाकृष्ण विखे पाटील

राहुरी(जनता आवाज वृत्तसेवा):- राजकारणात धोबीपछाड कसे करायचे हे स्व. शिवाजीराव कर्डीले यांना चांगले ठाऊक होते, आणि ते गुण त्यांनी निश्चित अक्षयलाही दिले असतील, आता सर्व कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करत सत्ता मिळवावी, हीच खरी श्रद्धांजली स्व.शिवाजीराव कर्डीले यांना ठरेल, असे प्रतिपादन ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

राहुरी शहरातील पांडुरंग लॉन्स येथे आयोजित स्व. कर्डीले यांच्या आदरांजली सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. संग्राम जगताप, माजी खा. सुजय विखे पाटील, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, अनिल मोहिते, विनायक देशमुख, रावसाहेब कर्डीले, रोहिदास कर्डीले, रभाजी सुळ, जालिंदर कदम, विक्रम तांबे, नामदेव ढोकणे, विलास साळवे, आप्पासाहेब विखे, शामराव निमसे, उत्तम म्हसे, सुरसिंग पवार, अण्णासाहेब बाचकर, गंगाधर सांगळे, साईनाथ कोळसे, शिवाजी सागर, कांतीलाल जगधने, प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते.

डॉ .सुजय विखे पाटील म्हणाले, “स्व. कर्डीले हे माझे मार्गदर्शक मित्र व जिल्ह्यातील राजकारणातील वस्ताद होते. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अक्षय कर्डीले ही जबाबदारी समर्थपणे पेलतील, आणि राहुरी नगरपरिषदेत महायुतीचा झेंडा फडकवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.”

आ. संग्राम जगताप यांनी सांगितले की, “स्व. कर्डीले हे कामाचा झपाटा लावणारे, प्रामाणिक आणि जनतेशी घट्ट नाते राखणारे नेते होते. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व पोटनिवडणुकीत सर्वांनी अक्षय कर्डीले यांच्या पाठीशी उभे राहावे.”

सत्यजित कदम यांनीही स्व.कर्डीले यांना आपले मार्गदर्शक संबोधत, “अक्षय कर्डीले यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी प्रयत्न करावेत” असे मत व्यक्त केले.

प्रसंगी अमोल भनगडे, सुरेश बानकर, विक्रम तांबे, धनंजय आढाव, राजेंद्र उंडे, विराज धसाळ, नयन शिंगी, रवींद्र म्हसे, अण्णासाहेब शेटे, सर्जेराव घाडगे, रावसाहेब तनपुरे, गणेश खैरे, नारायण धोंगडे, सुजय काळे, तसेच तालुका भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!