श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- दरम्यान आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अंजुमभाई शेख यांनी आजच्या सर्व घडामोडींवर भाष्य करताना सांगितले कि दीपक डावखर व मी चांगले मित्र आहोत. कालपर्यंत आम्ही बोलत होतो परंतु माझ्याविरुद्ध त्यांनी फिर्याद दिल्याची माहिती समजल्यानंतर मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो मी अंतरिम जामिनासाठी अर्ज देखील केला .डावखर परिवाराचा सदर जमिनी बाबतचा वाद कोर्टात गेल्याने वडील गेल्यावर एकट्याचे नाव लावले म्हणून त्यांच्या बहिणींनी आक्षेप घेतला होता व न्यायालयात डावकर यांच्या विरोधात देखील दाखल केलेला आहे .काही बाबींवर त्यांच्यात समझोता झाल्यानंतर त्यांच्या बहिणींनी जमीन विक्रीसाठी काढली . न्यायालयाची सर्व कागदपत्रे तपासून आम्ही रीतसर त्यांच्याशी व्यवहार केला त्यासाठी एक कोटी ५० लाख रुपये दिले पाच लाख तीस हजार रुपयाची स्टॅम्प ड्युटी आम्ही भरली . दिघे साठे आणि डावखर यांच्या दोन्ही आया यांच्याशी सर्व कायदेशीर व्यवहार ऑन पेपर केलेला आहे तसेच .अद्याप जागेचा ताबा आम्ही घेतलेलं नाही पूर्ण खरेदी झालेली नाही सातबाराला नोंद केलेली नाही फक्त फ्युचर एग्रीमेंट केलेला आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची लपवालपी आम्ही केलेली नाही न्यायालयाची फसवणूक करण्याचा तर विषयच नाही.
सदरचे प्रकरण हे दिवाणी न्यायालयाशी संबंधित असताना त्याला फौजदारी स्वरूप देण्यात आले तसेच तक्रार दाखल झाल्यानंतर एफ आय आर नोंदवण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची चौकशी पोलिसांनी केलेली नाही मला माहित झाल्यानंतर मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो .
या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वास येत आहे .माझ्या संपूर्ण आयुष्यात मी कोणाला साधी शिवी दिलेली नाही तर जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रश्नच नाही या माध्यमातून मला गोण्याचा व माझी राजकीय कारकीर्द संपविण्याचा प्रयत्न केला गेल्याचे स्पष्ट दिसत आहे परंतु न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे त्यामुळे पुढची लढाई आपण कायदेशीरपणे लढणार आहोत सध्या 14 तारखेपर्यंत अंतरिम जामीन न्यायालयाने दिला आहे .असेही अंजुमभाई यांनी सांगितले .
दीपक डावखर यांनी दाखल केलेल्या या फिर्यादीत त्यांच्या दोन्ही आया दोन्ही बहिणी दोन्ही मेव्हणे तसेच अनिल इंगळे विलास सासे आणि अंजुमभाई शेख एवढे सर्व जणांविरुद्ध फसवणुकीची ही तक्रार केलेली आहे .सदर प्रकरणात कोणती चौकशी न होता थेट एफ आय आर दाखल झाली आहे .परंतु इतर सर्व लोकांविरुद्ध कोणतीही कारवाई न होता फक्त अंजूम शेख अनिल इंगळे यांच्या विरोधात पोलिसांनी आज कारवाई केल्याने डावखर परिवारातील अन्य सदस्यांवर कारवाई देखील लावणे अपेक्षित होते अशी चर्चा शहरात होत आहे.
.याप्रकारे दुपारी पोलीस स्टेशनमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यातून सारखे फोन येत होते असे ही समजते .त्यामुळे या सर्व प्रकरणांमध्ये राजकीय दबाव वरिष्ठ पातळीवरून असल्याची जोरदार चर्चा देखील होत आहे.
पोलीस स्टेशन मधून घरी आल्यानंतर लगोलग आमदार हेमंत ओगले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर माजी उपनगराध्यक्ष करण ससाने मुजफ्फर शेख यांचे सह शेकडो कार्यकर्ते त्यांच्या घरी पोहोचले त्या ठिकाणी एक सभा होऊन झाल्या प्रकरणाबाबत उहापोह करण्यात आला. नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अंजुम भाई शेख यांना या प्रकरणात अडकवून निवडणूक पार पाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे यावेळी विविध वक्त्यांनी सांगितले .



