spot_img
spot_img

कोल्हारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन

कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा) :- कोल्हार भगवतीपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन व विविध विकासकामांचा शुभारंभ जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवती माता देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब खर्डे होते. अध्यक्षपदाची सूचना पंढरीनाथ खर्डे यांनी मांडली व त्यांच्या या सूचनेला शिवजयंती उत्सव समितीचे प्रदीप खर्डे यांनी अनुमोदन दिले.

डॉ. भास्करराव खर्डे पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे कोल्हारच्या वैभवात निश्चितच भर पडणार आहे. या कामी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अथक प्रयत्नातून हे कार्य होत आहे. त्यामुळे सर्व तरुणांनी तसेच विशेषतः सुरेंद्र खर्डे पाटील यांनी त्यांना साथ देऊन हात बळकट करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील म्हणाले की, कोल्हार भगवतीपुर तसेच कोल्हार बुद्रुकच्या ग्रामस्थांसाठी हा आनंदाचा तसेच ऐतिहासिक दिवस आहे. कोल्हार ग्रामस्थांसह शिवजयंती उत्सव समितीची अनेक वर्षाची मागणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांनी सतत पाठपुरावा करून तो पूर्णत्वास नेलेला आहे. गावाच्या विकासकामांमध्ये आपण नेहमी मंत्री विखे पाटील यांच्यासोबत आहोत.

याप्रसंगी अशोक शेठ असावा म्हणाले की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सुजय विखे पाटील यांच्या दूरदृष्टीकोनातून कोल्हार येथे झालेल्या विविध विकास कामांचा ऐतिहासिक क्षण हा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन करण्याचा कोल्हारकरांबरोबर मलाही तितकाच आनंद होत आहे. कोल्हार येथील शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने सातत्याने केलेल्या मागणीमुळेच हा क्षण अनुभवत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी बाराबलुतेदार तसेच सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. महाराजांच्या अश्वारूढ पुतळा हा प्रत्येक शिवप्रेमीला प्रेरणा मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळेच अहिल्यानगरच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक कोटी निधी उपलब्ध करून देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार असल्याचा संकल्प केला असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार तसेच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवत राज्यात धडाडीने निर्णय घेत आहे. त्यामुळेच नैसर्गिक आपत्तीप्रसंगी शेतकरी, व्यापारी, सामान्य नागरिक यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, अतिवृष्टीच्या काळात महायुती सरकारच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात भरीव निधी जमा होत असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. आरोग्याच्या बाबतीतही आयुष्यमान भारतच्या माध्यमातून प्रत्येक सामान्य नागरिकास पाच लाख रुपयापर्यंतचे संरक्षण कवच देत आहोत. त्यामुळे सरकारच्या विकास कामांचा केंद्रबिंदू हा सामान्य नागरिकच असल्याचेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रवरा सहकारी बँकेचे प्रवरा कारखाना उपाध्यक्ष सोपान शिरसाठ, नितीन कुंकुलोळ, ऋषिकेश खांदे, श्रीकांत खर्डे, ज्ञानेश्वर खर्डे, अमोल थेटे, राजेंद्र राऊत, संभाजी देवकर, उपसरपंच सविता खर्डे, कोल्हार भगवतीपुरचे सरपंच दत्तात्रय राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे, रविंद्र धनवटे, श्रीकांत बेंद्रे, केतन लोळगे, विकी डंक, अक्षय मोरे, आशुतोष बोरसे यांच्यासह शिवप्रेमी बहूसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार स्वप्निल निबे यांनी मानले.

शिवजयंती महोत्सव समितीच्या मागणीला यश

शिवजयंती महोत्सव समितीचे अमोल खर्डे, अजिंक्य भगत, प्रदीप खर्डे, अतुल राऊत, शिवाजी निकुंभ, अजित मोरे, संकेत कापसे, अविनाश खर्डे, अमर भगत, रोहित खर्डे, विनित हिरानंदानी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी वारंवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील आणि ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन झाले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!