श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा) :- येथील महाविकास आघाडीत असलेले मित्रपक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून श्रीरामपूर नगर परिषदेची निवडणुक मशाल या चिन्हावर नगराध्यक्ष पदासह सर्वच जागा स्वतंत्र लढण्याची घोषणा पत्रकार परिषदेत प्रभारी उत्तर जिल्हाध्यक्ष सचिन कोते यांनी माहिती दिली.
येत्या दोन तारखेला होणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राज्यात महाविकास आघाडीकडून एकत्र लढण्याची घोषणा केली असतानाच मात्र श्रीरामपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत आघाडीकडून बिघाडी झाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून आता ही लढत मैत्री पूर्ण होणार आहे असे स्पष्ट केले.
महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाला उमेदवारी जाहिर झाली असतानाच काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले, करण ससाणे याच्याशी उभाठाकडून प्रभारी उत्तर जिल्हाध्यक्ष सचिन कोते, अशोक मामा थोरे, लखन भगत, युवा सेनेचे निखिल पवार आदी सोबत बैठक झाली या बैकीत शिवसेनेकडून मशाल या चिन्हावर लढणार आहे. मात्र हे काँग्रेस पक्षाकडून या बैठकीत पालिकेत उमेदवारी हि पंजा या चिन्हावर लढावी असे मत काँग्रेसकडून सांगण्यात आल्याने शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून अमान्य करण्यात आले आहे. उभाठाकडून श्रीरामपूर नगर परिषदेच्या निवडणुक नगराध्यक्ष पदासह सर्व जागा मशाल या चिन्हावर मैत्रीपूर्ण लढणार असल्याचे ठाकरे गटाकडून सचिन कोते यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.



