spot_img
spot_img

तुषार जाधव यांना कृषीथॉन २०२५ चा ‘प्रयोगशील कृषी विस्तार कार्य सन्मान पुरस्कार’ प्रदान

नाशिक (जनता आवाज वृत्तसेवा):- आधुनिक शेतीत युवकांचा सहभाग वाढावा आणि प्रयोगशील कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा या उद्देशाने ‘कृषीथॉन २०२५’ या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात आज ‘प्रयोगशील कृषी विस्तार कार्य सन्मान पुरस्कार’  तुषार विलास जाधव यांना प्रदान करण्यात आला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोल्हार बु येथील तुषार विलास जाधव यांना कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हा मानाचा पुरस्कार मिळाला. तुषार जाधव हे कृषक गटाचे सक्रिय सदस्य तसेच गटाचे शेती सल्लागार असून शेतकऱ्यांना आधुनिक, वैज्ञानिक आणि प्रयोगशील तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करण्याचे त्यांनी सातत्याने कार्य केले आहे.

त्यांच्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमता, पीक व्यवस्थापन, स्मार्ट शेती तंत्रज्ञानाचा वापर आणि आधुनिक बाजारपेठेतील सहभागात लक्षणीय वाढ झाली आहे. या नाविन्यपूर्ण व प्रभावी कार्याची दखल घेऊन ‘कृषीथॉन’च्या निवड समितीने त्यांची निवड केली.

आज नाशिकच्या येथे झालेल्या कृषीथॉन समारंभात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार तुषार जाधव यांना प्रदान करण्यात आला. कृषी क्षेत्रातील तज्ञांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत हा सन्मान त्यांच्या प्रयोगशील आणि प्रभावी कृषी विस्तार कार्याची पावती असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी यावेळी विखे पाटील कारखान्याची संचालक  ज्ञानेश्वर पाटील खर्डे गटाचे सचिव , विनोद राऊत गटाचे सदस्य  भागवत शेळके, सुभाष शेळके, संजय राऊत , दत्तात्रय शेळके,  वैभव भणगे, पंचायत समिती सदस्य  भरत अंत्रे तसेच गटातील सदस्य उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!