spot_img
spot_img

आ. अमोल खताळ यांच्या बदनामीप्रकरणी अज्ञाताविरोधात तक्रार दाखल  आ. खताळांवरील खोट्या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वातावरण तापले

संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांची सोशल मीडियावर बदनामी आणि आचार संहितेच्या काळात दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 352, 353(2) आणि 356(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अक्षय दिलीप चिलाप रा. गुंजाळवाडी, संगमनेर यांनी स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली आहे. त्या। नुसार 14 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजता, तक्रारदार फेसबुक अॅप वापरत असताना “Sangamner Politics” या फेसबुक अकाउंटवरून त्यांच्या समोर एक पोस्ट आली. ही पोस्ट वादग्रस्त आणि धादांत खोटी असून कोणतेही कायदेशीर पुरावे उपलब्ध नसताना यामधून जाणीवपुर्वक आमदार अमोल खताळ यांची प्रतिमा मलिन करण्यात येत असल्याचे आढळून आले.

दाखल तक्रारीनुसार सोशल मीडिया पोस्टमध्ये आमदार अमोल खताळ यांचा फोटो लावून आक्षेपार्ह मजकूर लिहिला गेला आहे. तसेच संगमनेर नगरपरिषद निवडणूकीच्या अनुषंगाने पोस्ट पूर्णपणे चुकीची आणि राजकीय हेतूने प्रेरित असून, त्याचा मुख्य उद्देश आमदार खताळ यांना बदनाम करण्याचा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वी संगमनेर विधानसभा निवडणुक 2024 मध्येही सोशल मिडीया अॅपवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने निवडणुकीपूर्वी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले होते. तरीदेखील पुन्हा नगपरिषद निवडणुकीची आचारसंहिता असताना जाणीवपुर्वक दोन राजकीय गटांमध्ये व्देषाची भावना आणि वाद निर्माण होणार्‍या सोशल मीडिया पोस्ट केल्या जात आहेत. याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!