नेवासा (जनता आवाज वृत्तसेवा):-आज रात्री दहाच्या सुमारास नेवासा शहरातील नगरपंचायत चौकातील सुमारे आठ ते दहा दुकानांना मोठी भीषण आग लागली आहे.
नेवासा शहरात भीषण आग आठ दुकाने जळून खाक. लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या ठिकाणी अग्निशमन पथकाची घटनास्थळी धाव घेतली आहे. ही आग कशामुळे लागली अद्याप कारण समजले नाही.
यामध्ये कुठली जीवित हानी झाली आहे की नाही हे हे अद्याप समजले नाही.नगरपालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासन स्थानिक नागरिक आटोक्यात आणायचा प्रयत्न करत आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी आसपास परिसरातील अग्निशामक बोलवण्यात आले आहे.



