कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील कु.यज्ञा जगदीश दुसाने या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार व हत्येचा निषेध करण्यासाठी त्याच बरोबर सदर आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणी संदर्भात गुरुवार दि. 20 रोजी सकाळी 10.00 वा. कोल्हार येथील पोलीस दूरक्षेत्र या ठिकाणी निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
डोंगराळे येथील कु.यज्ञा दुसाने वर झालेल्या अत्याचारचा तीव्र शब्दात निषेध करताना त्यांनी म्हटले की कायदा व सुव्यवस्थेचा वचक न राहिल्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनाही कुठलाही जात धर्म नसतो. अगदी ठरवून ते सर्व गुन्हे करत असतात यामागे काही अंशी आपण सर्वजण याला जबाबदार आहोत.आताच्या काळात जवळजवळ सर्वच पक्षात अशा प्रकारचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोकप्रतिनिधी आहेत.आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवरच अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असताना आपण त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा कशी करू शकतो असा सवाल आहे त्यांनी यावेळी उपस्थित केला. जुन्या कायद्यामध्ये अनेक प्रकारच्या पळवाटा असल्यामुळे गुन्हेगारी फोपावत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दिल्ली मुंबई पुणे यासारख्या ठिकाणी यापूर्वीही अश्या घटना घडल्या असताना सरकारने कुठलीही ठोस कार्यवाहीची भूमिका घेतली नसल्यामुळे अथवा कायद्यात बदल न केल्यामुळे असे प्रकार वारंवार घडत असल्याचे आपल्याला पहावयास मिळत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कोल्हार येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व प्रवरा सहकारी बँकेचे मा. व्हॉ. चेअरमन अशोक असावा यांनी 100 वर्षापूर्वीचे जुने कायदे बदलण्याबरोबरच अशा प्रकारच्या घटनांमध्ये वेगळे न्यायालय उभे करून जलद गतीने न्याय मिळून देण्याची सरकारकडून अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर अशा प्रकारच्या विकृत मानसिक प्रवृत्तीच्या लोकांना भर चौकात शिक्षा द्यावी की ज्यामुळे या प्रवृत्तीला आळा बसेल.
पद्मश्री विखे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर खर्डे यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करताना म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारची घटना घडणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारने घटनेतील गुन्हेगाराला जनतेसमोर शिक्षा देऊन कडक संदेश द्यावा.
पद्मश्री विखे कारखान्याचे मा. संचालक स्वप्निल निबे यांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दात तीव्र शब्दात निषेध करताना म्हटले की ज्याप्रमाणे नरभक्षक बिबट्याला दिसता क्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश सरकारने दिले आहे त्याचप्रमाणे अशा प्रकारचे दुष्कृत्य करणाऱ्या लोकांना देखील दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश द्यावा. तरच यावर लगाम घालता येईल.
शिवसेना उत्तर अहिल्यानगर महिलाआघाडी प्रमुख सुनीता शेळके यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध म्हटले की सदर घटनेतील आरोपीला सरकार ने भर चौकात शिक्षा द्यावी त्यामुळे अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाही.
याप्रसंगी पत्रकार सुहास वैद्य, श्रीकांत बेंद्रे,श्याम गोसावी,स्वप्निल लोखंडे सुरेश पानसरे सुनील बोरुडे, हर्षद बर्डे,कामेश बोरुडे,आसिरभाई पठाण यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून कु. यज्ञाला श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान याप्रसंगी लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिरीष चौधरी यांच्याकडे डोंगराळे येथील कु. यज्ञ दुसाने हिला लवकरात लवकर न्याय मिळवून सदर घटनेतील गुन्हेगारास फाशीची शिक्षाफाशीची शिक्षा देण्याच्या मागणी संदर्भात सर्वांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी भगवती माता देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष साहेबराव दळे, कोल्हार भगवतीपुरचे उपसरपंच प्रकाश खर्डे,भगवती माता देवालायचे विश्वस्त अजित मोरे, उद्योजक नितीन कुंकूलोळ, पद्मश्री विखे कारखान्याचे संचालक श्रीकांत खर्डे, पंढरीनाथ खर्डे, कोल्हाळेश्वर पतसंस्थेचे चेअरमन भरत (आबा )खर्डे, दीपक देडगावकर, गोरख खर्डे,शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमोल खर्डे, पत्रकार गणेश सोमवंशी, तुषार बोऱ्हाडे, केतन लोळगे, महाशिवरात्र महोत्सव समितीचे अध्यक्ष अक्षय मोरे, संतोष टेकाडे,ज्येष्ठ उद्योजक पुरुषोत्तम हिरानंदानी आदी मान्यवर पत्रकार बांधव तसेच सर्व धर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



