श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा ):- येत्या दोन डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीसाठी हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण ससाणे यांच्यासह सर्वच काँग्रेस उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला असल्याची माहिती हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
यावेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने पत्र काढण्यात आले सदर पत्रकार म्हटले आहे की, श्रीरामपूर मध्ये लोकसभा व विधानसभेला आम्ही हिंदुत्वादी कार्यकर्ते म्हणून काम करीत राहिलो , गेल्या पंचवीस ते तीस वर्षात माजी आमदार स्वर्गीय जयंतराव ससाने यांनी नगरपालिकेमध्ये सगळ्या समाजाला नगराध्यक्ष पदासाठी संधी दिली व श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने रस्ते पाणी लाईट या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले. श्रीरामपूरच्या जनतेला कुठलाही त्रास होऊ दिला नाही. मोठ्या प्रमाणावर निधी नगरपालिकेच्या माध्यमातून श्रीरामपूरसाठी आणला. त्यांच्या काळामध्ये त्यांनी अठरापगड जातीला बरोबर घेऊन काम केले कधीही तू या समाजाचा किंवा अमुक समाजाचा असा कुठलाही जाती धर्माचा विचार न करता शहरांमध्ये विकास केला म्हणूनच श्रीरामपूर ची जनता आजही स्वर्गीय ससाणे यांना विसरू शकले नाही.
त्याच पावलावर पाऊल टाकत त्यांची चिरंजीव माजी उपनगराध्यक्ष करण चासाने हे काम करत आहे. आजची श्रीरामपूर ची परिस्थिती अत्यंत दयनीय असून रस्त्यांचे तसेच पिण्याच्या पाण्याचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे. श्रीरामपूरचा रखडलेला विकास पूर्ण करण्यासाठी जनतेने करन ससाणे यांना नगराध्यक्ष पदाची संधी द्यावी. एक चांगला युवक स्वच्छ चरित्र व धडाडीचे नेतृत्व तसेच कधीही कुणाशी वादाची भाषा न करणारे म्हणून करण ससाणे यांची ओळख आहे. स्वर्गीय जयंतराव ससाणे यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी करण ससाने व काँग्रेसच्या सर्वच उमेदवारांना मोठ्या संख्येने मतदान करून सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन करण्यात आले.
प्रसिद्ध केलेल्या पत्रकावर प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळे, शहराध्यक्ष मंगेश छतवानी, जिल्हा उपाध्यक्ष बी एम पवार, जिल्हा सरचिटणीस यश ठोंबरे, तालुकाध्यक्ष शिवाजी फोपसे, संपर्कप्रमुख चिलिया तुवर, जिल्हा संघटक सोपानराव पागिरे, जिल्हा सचिव नंदकुमार बगाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



