बाभळेश्वर(जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने बुधवार दि.10 डिसेंबर रोजी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
बैलांची ताकद, गती, आणि गाडी हाकण्याच्या कौशल्याचा भाग व महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचं दर्शन दाखवणारा क्रीडा प्रकार म्हणजे शर्यत.
बाभळेश्वर येथे प्रथमच होत असलेल्या या बैलगाडा शर्यतीचे पाचगट शिवारात ९०० मीटर धावपट्टीवर आयोजन केले आहे. भिमयोद्धा तरूण मित्र मंडळ यांचे वतीने पहिल्यांदाच या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक विजेत्या बैलजोडीच्या मालकांना ३ हजार ते ११ हजार पर्यंतची बक्षिसे देण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित बैल जोड्यांचा थरार नागरिकांना पाहायला मिळणार असल्याने उत्साहाचे वातावरण आहे.
या थरारक शर्यतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भिमयोद्धा तरूण मित्र मंडळाचे अध्यक्ष नितीन दुशिंग व पंचायत समितीचे उपसभापती बबलू म्हस्के यांनी केले आहे.



