करंजी (जनता आवाज वृत्तसेवा):- आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या राजकीय जीवन कार्यामध्ये सर्वसामान्य जनतेला आपले दैवत म्हणून नेहमी त्यांच्या सुखदुःखात धावून जाण्याचा प्रयत्न केला. गोरगरिबांना जनता दरबाराच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला कर्डिले साहेबांनी कमवलेल्या माणसांच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही 24 तास त्यांच्या सेवेसाठी तत्पर राहण्याचा प्रमाणितपणे प्रयत्न करेल असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक युवानेते अक्षय कर्डिले यांनी केले आहे.
पाथर्डी तालुक्यातील करडवाडी येथे आमदार कर्डिले यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ते राहुल ढाकणे यांच्या वतीने देण्यात आलेल्या 500 आंब्याच्या झाडांचे वाटप अक्षय कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे होते.
या कार्यक्रमाप्रसंगी अक्षय कर्डिले म्हणाले पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याला देखील महत्त्व देणारा असून शेतीचा पाणी प्रश्न निश्चितपणे मार्गी लावला जाईल त्याचबरोबर विकास कामातही कुठे कमी पडणार नाही यासाठी तुमची साथ आणि सहकार्य महत्त्वाचे असल्याचे कर्डिले म्हणाले.
या कार्यक्रमाप्रसंगी माजी सभापती संभाजी पालवे, मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे, युवानेते कुशल भापसे, चेअरमन पुरुषोत्तम आठरे,वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे, सरपंच श्रीकांत आटकर, युवानेते भैय्या बोरुडे, चेअरमन धीरज मैड, बंडू पाठक, अण्णासाहेब शिंदे, महादेव कुटे, किरण कराळे, प्रणील सावंत, प्रदीप टेमकर, रवींद्र भापसे, गणेश सावंत, मनोज ससाने, बाबाजी पालवे, किशोर पालवे, अक्षय पालवे, सोमा कुऱ्हे, बाळासाहेब गर्जे, नवनाथ ढाकणे, बाळासाहेब कराड, चंद्रकांत गर्जे, संजय पाखरे, भाऊसाहेब बुधवंत, पोपट लोमटे, अर्जुन गर्जे, गणेश बुधवंत, राजेंद्र गर्जे, किरण गर्जे, बाप्पू कुरे, संदीप गर्जे, अर्जुन बुधवंत, बाबाजी टापरे, वॉटर शेडचे पांचाळ, गायकवाड यांच्यासह करडवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



