अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):-अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री करणाऱ्या रॅकेट विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने मोठी मोहीम उघडत दोन ठिकाणी धडक कारवाई केली.या कारवाईत एकूण ₹2,43,716/- किंमतीचा गुटखा व स्विफ्ट कारसह मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या विशेष निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात आली.अवैध गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्या इसमांवर कडक कारवाई करण्याचे आदेश सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, यांनी स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते.या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.या पथकात पोलीस अंमलदार राहुल द्वारके,भिमराज खर्से, राहुल डोके,बाळासाहेब गुंजाळ, सुनिल मालणकर,सतिष भवर, प्रमोद जाधव,प्रशांत राठोड यांचा समावेश होता.
पथकास गुप्त माहिती संकलन व तत्काळ कारवाईचे निर्देश देण्यात आले.दि.10 डिसें. रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गुटखा वाहतूक व विक्री सुरू असल्याची माहिती पथकाच्या हाती लागली. त्यानुसार दोन स्वतंत्र ठिकाणी धाड टाकण्यात आली.ही कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील वरील सर्व अंमलदारांनी संयुक्तपणे यशस्वीपणे केली.



