spot_img
spot_img

शिर्डी पुन्हा एकदा हादरली ! भर चौकात तरुणाची हत्या

शिर्डी(जनता आवाज वृत्तसेवा) :- शिर्डी शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा भडका उडाला असून भर चौकात तरुणावर सपासप वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिर्डी विमानतळ रोडवरील अग्निशामक स्टेशनजवळ चौधरी नावाच्या तरुणावर अचानक काही तरुणांनी प्राणघातक हल्ला केल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

प्रत्यक्ष माहिती अशी की, हल्लेखोरानी अचानक युवकास घेरत धारदार शस्त्राने सपासप वार केले. हल्ला इतका अचानक व भीषण होता की काही क्षणांतच चौकात आरडाओरड व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांमध्ये भीती पसरली असून काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.

घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या युवकास तातडीने सुपर हॉस्पिटल, शिर्डी येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीबाबत निरीक्षण ठेवण्यात आले आहे.

भर चौकात रक्तरंजित हल्ला तरुणावर सपासप वार केल्याच्या घटनेमुळे शिडीकरांमध्ये पोलीस प्रशासनबद्दल रोज निर्माण होत आहे. कारण शिर्डी मध्ये वाढत असलेली गुन्हेगारी याला कुठेतरी पोलीस प्रशासनाचा पाठिंबा असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले असून पोलीस प्रशासनाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी व त्यांना अटक करण्यासाठी विशेष पथक सक्रिय करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

या घटनेमुळे शिर्डीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शिर्डी पोलीस पुढील तपास करत असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. या घटनेमुळे शिडीकरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये शिर्डी हे जागतिक तीर्थक्षेत्रापैकी एक असून यामध्ये अशा प्रकारच्या घटना गेल्या काही महिन्यापूर्वी घडल्या होत्या.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!