spot_img
spot_img

श्रीरामपूरचा गड राखण्यात काँग्रेसला यश श्रीरामपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी करण ससाने विजयी निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 20, भाजपचे 10, शिंदे गट तीन, एक अपक्ष, असे बलाबल

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत पुन्हा एकदा सत्तेचा गड राखला आहे. नगराध्यक्षपदाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या लढतीत काँग्रेसचे उमेदवार करण ससाणे यांनी दणदणीत विजय  मिळवला आहे.

या निवडणुकीत सर्वात मोठी खळबळ माजी नगराध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अनुराधा आदिक यांच्या पराभवाने उडाली आहे. नगरसेवकपदाच्या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला शहरात मोठा धक्का बसला आहे.

या नगरपालिकामध्ये एकूण ३४ नगरसेवक संख्या होती. नगरसेवक पदाच्या पक्षनिहाय आकडेवारीमध्ये काँग्रेसने-महाआघाडीने सर्वाधिक २० जागा जिंकून बहुमत प्राप्त केले आहे. भारतीय जनता पक्षानेही आपली उपस्थिती प्रभावीपणे नोंदवत १० जागांवर विजय मिळवला, तर शिंदेंच्या शिवसेनेला ३ जागा आणि एका अपक्ष उमेदवाराला विजय मिळाला आहे.

शिंदे गटाचे उमेदवार प्रकाश चित्ते यांनीही 8000 पेक्षा जास्त मतदान घेतले असून पण निवडून येण्याकरिता ते खूप मागे पडले असे दिसून येत आहे.

करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मिळवलेल्या या मोठ्या यशामुळे शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे काँग्रेसच्या बाजूने झुकली असून, कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत हा ऐतिहासिक विजय साजरा केला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!