spot_img
spot_img

उद्धव ठाकरे – राज ठाकरे उद्या एकत्र येणार?

मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा उद्या दुपारी 12 वाजता होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ही माहिती दिली.

राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालीय. त्यातही उभ्या देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेसाठी भाजपने जोर लावला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज एकत्र आलेत.

संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडियावर एक ट्विट केले आहे. त्यात फक्त तीन शब्दांत आपले नेमके म्हणणे मांडले आहे. ‘उद्या १२ वाजता’ असे वाक्य लिहून त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एक फोटो ट्विट केलाय. त्यात ठाकरे बंधूंच्या हातांमध्ये गुलाबांच्या फुलांचा एक मोठा गुच्छ दिसतोय. एकाद्या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजप नेते राम कदम म्हणाले की, ‘राज ठाकरे यांनी पक्ष सोडला नव्हता. त्यांना उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडायला भाग पाडले होते. मात्र, आता त्यांना राज यांची आवश्यता आहे. त्यामुळे ते त्यांच्या दारी गेलेत. कोविडच्या काळात ते घराबाहेर पडले नाहीत. जनतेच्या कफनमध्ये पैसे खाल्ले. आता दोघेही मराठी माणसांवर बोलतील. मात्र, यांना आवश्यकता असेल, तेव्हा मराठी माणूस आठवतो. हे किती एकत्र येऊ द्या. त्यांचा आकडा ३५-४० च्या वर जाणार नाही,’ अशी टीका त्यांनी केली.

मुंबई महापालिकेचे देशाच्या राजकारणात मोठे महत्त्व आहे. ही देशातली सर्वात मोठी महापालिका आहे. मुंबई महापालिकेचा २५- २६ साठीचा अर्थसंकल्प तब्बल ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचा आहे. गोवा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरापेक्षाही मुंबई महापालिकेचे बजेट मोठे आहे. त्यामुळेच सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चा बांधणी सुरू केली आहे. येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसतील.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!